Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे घर हे आतापर्यंत अनेक सदस्यांनी गाजवलं आहे. बिग बॉस मराठीचा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा सीझन प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला. त्यानंतर बिग बॉसचे यंदाचे पाचवे सीझनही जोरदार सुरु आहे, मात्र हे लवकरच हा नवीन सीझन प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातले राडे व भांडण पाहिल्यानंतर या सीझनमध्ये वाइल्ड कार्ड एण्ट्री व्हावी अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली होती. पण वाइल्ड कार्ड एण्ट्रीने प्रेक्षकांची नाराजी केली. १०० दिवस चालणारा हा शो आता काही कारणामुळे ७० दिवसच असणार आहे. येत्या ६ ऑक्टोबर रोजी या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्याआधी ‘बिग बॉस’ घरातील सदस्यांची आणि घराबाहेरील प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करत आहे. (Abhijeet Bichukle In Bigg Boss Marathi 5)
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या घरात राखी सावंत यावी अशी इच्छा व्यक्त केली जात होती आणि ती इच्छाही पूर्ण झाली आहे, नुकतंच कलर्स मराठीने राखी सावंतच्या एण्ट्रीचा व्हिडीओ शेअर केला होता. अशातच आता या घरात आणखी एक अवलिया माणूस येणार आहे तो म्हणजे अभिजीत बिचुकले. सोशल मीडियावर अभिजीत बिचुकलेंच्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील एण्ट्रीचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात अभिजीत बिचुकले आपल्या हटके अंदाजाने एण्ट्री घेतानाचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये ते “डॉ. अभिजीत बिचुकलेका सादर नमस्कार” असं म्हणत एण्ट्री करतात. पुढे त्यांनी अंकिताने सूरजलाअ नॉमीनेट केल्याबद्दल ‘बहीण असं कधीच करत नाही” असं म्हणत ओरडतात. पुढे ते “तुमचा कुचकेपणा दिसला” असंही म्हणतात. त्यानंतर ते “मला इतका यंग येत आहे की मी या घरातलं काहीही फोडू शकतो” असं म्हणतात. एकूणच अभिजीत बिचुकलेंचा हा नवीन प्रोमो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान, राखी पाठोपाठ अभिजीत बिचुकलेंचीदेखील बिग बॉस मराठीनध्ये एण्ट्री झाल्यामुळे बिग बॉस प्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अभिजीत बिचुकलेंच्या एण्ट्रीच्या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी कमेंट्सद्वारे त्यांना या घरात पाहण्याची उत्सुकता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता बिग बॉस मराठीच्या शेवटच्या आठवड्यात नक्की काय मजा येणार?, नवीन आलेले सदस्य घरातील इतरांची कशी शाळा घेणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत हे नक्की…