रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “तिने निक्कीची शिकार करावी आणि…”, जान्हवी किल्लेकरच्या नवऱ्याची पोस्ट चर्चेत, म्हणाला, “तिचा आवाज फक्त…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 27, 2024 | 10:42 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5 jahnavi killekar husband post

जान्हवी किल्लेकरच्या पतीचा बायकोला फुल्ल सपोर्ट, पोस्ट शेअर करत म्हणाला...

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून दोन स्पर्धकांची चांगली चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. हे दोन चर्चेत असलेले स्पर्धक म्हणजेच निक्की तांबोळी व जान्हवी किल्लेकर. निक्की तांबोळी व जान्हवी किल्लेकर यांनी अगदी पहिल्या दिवसापासून ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. दोघींमधील मैत्रीचा बॉण्डही पहिल्या दिवसापासून पाहायला मिळाला. अगदी पहिल्या दिवसापासून निक्कीची पाठराखीन बनून जान्हवी घरात वावरू लागली. निक्की जशी वागेल तसं जान्हवीही वागू लागली. मात्र भाऊच्या धक्क्यावर निक्कीने टीम A मधून एक्झिट घेतली.

जान्हवी व निक्की यांच्या मैत्रीत दुरावा आला. मैत्री होती तेव्हा अनेकांनी निकीची सावली म्हणत तिला ट्रोल केलं. निक्कीने अपमान केला तर जान्हवीनेही मराठीतील दिग्गज कलाकार मंडळींचा अपमान केला. यावरुन रितेश देशमुखने जान्हवीची चांगली शाळा घेतली. काही दिवसांपूर्वी जान्हवीने पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळे यांच्या अभिनय कारकीर्दीवरुन केलेलं भाष्य अनेकांना खटकलं. साऱ्या महाराष्ट्रातून जान्हवीला ट्रोल करण्यात आलं. शिवाय रितेश देशमुखने ही जान्हवीला यावरुन चांगलच झापलं. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने जान्हवीची शाळा घेत तिला शिक्षा म्हणून जेलमध्ये बंद केलं.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : अरबाजने रागाच्या भरात घरातल्या वस्तू फोडल्या, जोरजोरात ओरडला अन्…; निक्की-अभिजीतची जवळीक सहन पाहवेना

एक आठवडा तुम्ही या जेलमध्येच राहाल आणि आज व उद्याचा भाऊचा धक्का तुम्ही बसणार नाही असं म्हणत तिला जेलमध्ये पाठवलं. सध्या जान्हवी ‘बिग बॉस’च्या घरात जेलमध्ये बंदिस्त असलेली पाहायला मिळतेय. दरम्यान जान्हवीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक पोस्ट वायरल होत आहे की, “पिंजऱ्यातून बाहेर आल्यानंतर जखमी वाघीण पहिली शिकार कोणाची करणार?”, हा प्रश्न विचारत ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे आणि यावर अनेक कमेंट्स आलेल्या पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : आदित्य-प्रीतममध्ये दुरावा, प्रियाबरोबरच नात समोर आलं आणि…; मालिकेत मोठा ट्विस्ट

या पोस्ट खाली अनेकांनी कमेंट करत निक्की तांबोळी असं म्हणत जान्हवीला पाठिंबा दिलेला पाहायला मिळतोय. तर काहींनी जान्हवीला ट्रोल केलेला पाहायला मिळत आहे. दरम्यान सदर पोस्ट जान्हवीचे पती किरण किल्लेकर यांनी इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर करत असं म्हटलं आहे की, “निक्कीची करावी हिच अपेक्षा आहे. कारण तिच्या टक्करचा आवाज फक्त जान्हवीमध्येच आहे”. एकूणच किरण किल्लेकर यांनी जान्हवीला पाठिंबा दिलेला पाहायला मिळत आहे.

Tags: bigg boss marathibigg boss marathi 5jahnavi killekar husband post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 paddy kamble and abhijit sawant

Bigg Boss Marathi : अभिजीतला लागलं निक्कीच वेड, पॅडी दादांनाही दिलं उलट उत्तर, म्हणाला, "तुम्ही त्रास देता आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.