Bigg Boss Marathi 5 Grand Finale : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व यंदा २८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं. १०० दिवस चालणाऱ्या या शोने यंदा मात्र अवघ्या ७० दिवसांत आपला गाशा गुंडळला. यंदाच्या सीझनमध्ये एकूण १६ स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या चक्रव्यूहात सहभाग घेतला होता. अनेक अडचणींवर मात करून १६ जणांपैकी फक्त सहा जणांचा घरात शेवटपर्यंत निभाव लागला. प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवत यंदा अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अंकिता प्रभू वालावलकर, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर या सहा सदस्यांनी ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली. (Bigg Boss Marathi 5 Grand Finale)
‘बिग बॉस मराठी ५च्या ग्रँड प्रीमियर सोहळ्याला अगदी दणक्यात सुरुवात झाली असून स्पर्धकांच्या डान्स परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केलं आहे. आजच्या या ग्रँड फिनालेच्या विशेष भागात घरातील सर्व स्पर्धकांचे धमाकेदार डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत. कलर्स मराठीने शेअर केलेल्या काही प्रोमोमधून ग्रँड फिनालेची झलक पाहायला मिळाली.
बिग बॉस मराठी ५च्या अंतिम फेरीत एकूण सहा स्पर्धकांनी एन्ट्री घेतली असली तरी त्यापैकी काहींचा प्रवास अगदी अंतिम सोहळ्याच्या उंबऱ्याशी येऊन संपला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या अंतिम फेरीत सहापैकी दोन जाणार असल्याचे रितेशने आधीच सांगितले होते. त्यानुसार, धनंजय, जान्हवी, निक्की व अंकिता यांचा प्रवास अंतिम टप्प्यात येऊन संपला असून टॉप २ मध्ये सूरज व अभिजीत यांनी बाजी मारली आहे.
‘बिग बॉस मराठी ५’च्या ग्रँड प्रीमियर सोहळ्याला अगदी दणक्यात सुरुवात झाली असून स्पर्धकांच्या डान्स परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केलं. लवकरच या शोचा विजेता घोषित केला जाणार आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी बाजी मारत ‘बिग बॉस मराठी ५’च्या झगमगत्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि यासाठी अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत.