‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वात एक सौ एक दमदार स्पर्धक आले आहेत. एकूण १६ स्पर्धकांपैकी एका स्पर्धकानं सर्वांचं लक्ष वेधलं ती म्हणजे परदेसी गर्ल इरिना रूडाकोवा. परदेसी गर्ल असली तरी तिला भारताविषयी आणि मराठी भाषेविषयी खूप जिव्हाळा आहे. इरिना अनेक वर्ष मुंबईत राहत आहे. त्यामुळे तिला इथली भाषा कळते. मराठी भाषा कळत असली तरी बोलताना तिला काही अडथळे येतात. परदेसी गर्ल इरिनाची मराठी भाषा शिकण्याची धडपड, तिचा मराठी भाषेतला गोडवा घरात वेळोवेळी पाहायला मिळतोय. बिग बॉसच्या घरात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील एक सदस्य आहे. त्या सगळ्यांकडून इरिनानं ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली आहे.
इरीना घरात आल्यापासून तिचं आणि मराठीचं असलेलं नातं प्रेक्षकांना फार भावत आहे. तिचा मराठी बोलण्याचा प्रयत्न, तुपासाठी भांडणं, पुरणपोळी बनवण्याचा हट्ट,एकादशीचे उपवास असोत, या सगळ्याचं मराठी प्रेक्षकांनाही फार अप्रुप वाटतंय. त्यामुळे इरीनाच्या मराठीपणाचं भरभरुन कौतुक केलं जात असल्याचं चित्र आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी इरीनाला मराठीचे धडे देण्यासाठी धनंजय प्रयत्न करताना दिसून आला होता. घरातील सगळ्या सदस्यांकडून मराठीचे धडे घेत घेत इरिना थेट धनंजयकडे पोहोचते. यावेळी धनंजय तिला कोल्हापूरी भाषा शिकवतानाचे पाहायला मिळाले. इरीना-डिपी यांच्या या रीलकर धनंजय यांच्या खऱ्या पत्नीनेही एक भन्नाट रील व्हिडीओ केला आहे.
आणखी वाचा – Video : अरबाज-निक्कीचा मराठमोळ्या गाण्यावर Bigg Boss Marathi च्या घरात भन्नाट डान्स, उलचून घेत किस केलं अन्…
डिपी दादांच्या खऱ्या आयुष्यातील एका मैत्रिणीने त्यांच्या एका मित्राबरोबर हा रील व्हिडीओ शेअर केला असून यात त्या माझ्या मागे मागे इंग्लिशची चार वाक्ये म्हणा असं डिपी यांच्या मित्राला सांगतात. त्यानंतर त्या हे धनंजय हाऊ आर यू? व्हॉट आर यू डूइंग? व्हेअर आर यू गोइंग स्टुपिड” अशी इंग्रजी भाषेतील वाक्य म्हणतात. त्यांच्या मागे मागे डिपी यांचे मित्रही टे वाक्य म्हणतात. यापुढे ती तुमचं मालक तुम्हाला असं काही शिकवतो का? तिकडे ते त्या इरीनाला बघा कसं इंग्रजी शिकवत आहेत.
यापुढे डिपीचे मित्र असं म्हणतात की, “आमचे मालक हुशार आहेत म्हणून बिग बॉसमध्ये गेले आहेत. आमच्या मालकाचा विषय हार्ड आहे. सुपला शॉट, संपला विषय”. असं म्हणतात. या व्हिडीओवर “खरा डिपी पवार ‘बिग बॉस’च्या दोनच एपिसोड मध्ये कळाला, धनु भाऊ विजय आपलाच आहे”, “इरिना सोसायटी फर्निचरची नवी MD होते बहुतेक आता”, “वहिनी आता दादा तुम्हाला विचारत नाही तुम्ही आता विषय सोडून द्या दादाचा” अशा मजेशीर कमेंट्स केल्या आहेत..