गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दिखाव्यासाठी नाही तर…”, नवीन गाडी घेताच अंकिता वालावलकरची प्रतिक्रिया, म्हणाली, “स्वतःचं अस्तित्त्व…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 11, 2025 | 1:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bigg boss Marathi 5 fame ankita walawalkar expressed her feelings After buying a new car post viral on social media

नवीन कार खरेदी केल्यानंतर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

कलाकारांबरोबरच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरदेखील सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अशीच एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजे ‘बिग बॉस मराठी ५’फेम अंकिता वालावलकर. ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ती सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करा चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत असतो. अशातच सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत आणि हे फोटो आहेत तिच्या नवीन गाडीचे. अंकिताने नुकतीच एक महागडी आलिशान गाडी खरेदी केली असून याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  (ankita walawalkar new car)

अंकिताने नव्या गाडीविषयी पोस्ट शेअर करण्याआधी ‘तुम्ही तयार आहात का?’, ‘ती आलीये, वाट बघतेय’ अशा उत्सुकता वाढवणाऱ्या इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केल्या होत्या. त्यानंतर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये अंकिताने महागडी गाडी घेतल्याचे समोर आले. होणारा नवरा कुणाल भगतचा हात हातात घेऊन, नव्याकोऱ्या महागड्या गाडी शेजारी उभं राहून तिने हा फोटो पोस्ट केला. ‘आवडी आली’, असं कॅप्शन देत तिने ही इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली. त्यानंतर आता आणखी काही फोटो पोस्ट करत तिने आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

आणखी वाचा – “लग्नाचं गिफ्ट म्हणून…”, अंकिता वालावलकरने नवीन गाडी घेताच डीपी दादांची भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाले, “मुंबईत फिरायला…”

अंकिताने नवीन गाडीबरोबरचे फोटो पोस्ट करत असं म्हटलं आहे की, “फार मोठी स्वप्नं बघु नये, अंथरूण पाहून पाय पसरावेत हे ऐकत मोठे झालो. पण मोठी स्वप्नं बघायला हरकत काय आहे? आणि अंथरूण लहान आहे तर अंथरूण मोठं घेऊ असा विचार करत इथपर्यंत पोचले. जेव्हा जेव्हा मी एक पाऊल मागे गेले आहे, ते नेहमीच पुढे झेप घेण्यासाठी. गावातुन मुंबईत येणं, त्यानंतर २ बहीणींना मुंबईत आणणं, भाड्याच घर शोधणं, मुंबईत राहणं, स्वतःचं अस्तित्त्व निर्माण करणं हा प्रवास सोप्पा नव्हता. आई-बाबांनी जो विश्वास दाखवला त्यामुळेच एवढं करू शकले”.

आणखी वाचा – “त्याने स्वत:हूनच… ”, ‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांनी सांगितलं गुरुचरण सिंहच्या शो सोडण्याचे नेमके कारण, म्हणाले, “अनेक समस्या…”

यापुढे अंकिताने असं म्हटलं आहे की, “आज ही घेतलेली गाडी दिखाव्यासाठी नाही तर अंथरूण व्यवस्थित असल्यामुळे घेतली आहे. मी तर म्हणेन मोठी स्वप्नं बघा, कोणतही काम करायला लाजू नका, कधीतरी नमतं घ्या, कधीतरी स्वतःहून बोला. पण हे होत नाही, आता कसं होईल, म्हणून थांबू नका”. यापुढे तिने मालवणी भाषेत “माकाच बघा यंदा आवडीतसुन हापूस आंबे विकतलंय” असंएए गंमतीत म्हटलं आहे. दरम्यान, अंकिताच्या या पोस्टला अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी तिला या नवीन गाडीनिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.     

Tags: ankita prabhu walawalkar carankita walawalkar new carankita walawalkar new car special post
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Shiva took a special ukhana for Ashu Zee Marathi Makar Sankrant special program video viral on social media.

Video : “बाईकवरुन तिळगूळ वाटताना...”, आशूसाठी शिवाने घेतला हटके उखाणा, म्हणाली, “त्याला जो पण नडेल...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.