Ankita Walavalkar : ‘बिग बॉस मराठी मुळे घराघरांत पोहोचलेला लोकप्रिय चेहरा म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर. अंकिता वालावलकरने ‘बिग बॉस’च्या घरात तुफान राडा केलेला पाहायला मिळाला. ‘बिग बॉस’मुळे लोकप्रियतेस आलेली अंकिता तिच्या मालवणी भाषेतील रील व्हिडीओमुळे विशेष चर्चेत असलेली पाहायला मिळते. अभिनेत्रीच्या रील व्हिडीओला प्रेक्षकांची नेहमीच पंसती मिळते. सोशल मीडियावर अंकिताचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अंकिता व्यावसायिक आयुष्याबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बरेचदा चर्चेत असलेली पाहायला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावरुन जाहीर प्रेमाची कबुली दिली. त्यामुळे अंकिता विशेष चर्चेत आली. अंकिता संगीत दिग्दर्शक कुणाल भगत रिलेशनशिपमध्ये आहे.
अशातच आता अंकिताने तिच्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. अंकिताने एका नव्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेसाठी तिने प्रोमो गीत लिहिलं असल्याची माहिती नुकतीच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत दिली आहे.‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या २३ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या लक्ष्मी निवास या मालिकेच शीर्षकगीत अंकिताने लिहिलं असल्याचं समोर आलं आहे. ही गोड बातमी अंकिताने चाहत्यांसह शेअर केली आहे.
व्हिडीओ शेअर करत अंकिता असं म्हणताना दिसत आहे की, “झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवीन मालिका तुमच्या भेटीला येतेय. या मालिकेचं नाव आहे लक्ष्मी निवास. यासाठी मी गाणं लिहिलंय. मी लिहिलेलं हे पहिलं गाणं हर्षवर्धन वावरे याने गायलं आहे आणि कुणाल-करण यांनी हे गाणं कंपोझ केलंय. लहानपणापासून मला गाण्याची आवड होती आणि या प्रोमोच्या निमित्ताने मी याची सुरुवात केलेली आहे”. हा व्हिडीओ शेअर करताच अंकितावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.
अंकिताने लिहिलेल्या या मालिकेच्या प्रोमोचे बोल, “स्वप्न सारे पाहिले घर आनंदाचे आधार नात्यांना भासतो, दुःख भारी वाटते स्वप्न थोडे अडखळते वेळ संयमाची वाटते, घर हे दिसती चार भिंती जणू पण ही भावनांची कुस वीणू, सावरु स्वप्न पुन्हा पाहण्या सुखाची या गोष्ट पुन्हा लिहिण्या, बंध ते जे सुख बोलती मखमली स्वप्नांचे लक्ष्मी निवास ते”, असे आहेत. अंकिताच्या या पहिल्याच गाण्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत