शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आधी घनःश्याम नंतर डीपी बाहेर पडेल”, मराठी अभिनेत्याच्या कमेंटवर भडकले प्रेक्षक, म्हणाले, “हे तुम्ही सांगू नका आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 3, 2024 | 3:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates marathi actor pushkar jog talked about ghanshyam darawade and dhananjay powar will eliminate

Bigg Boss Marathi 5 मधून घन:श्याम दरवडे व धनंजय पोवार नॉमिनेट होणार, सुप्रसिद्ध अभिनेत्याचा दावा

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रत्येक आठवड्यात या घरात नॉमिनेशन टास्क पार पडते आणि या टास्कमध्ये घरातील प्रत्येक स्पर्धक इतर स्पर्धकांचे या घरातील स्थान कसं कमी आहे हे सिद्ध करतो आणि स्वत:ला वाचवून इतरांना नॉमिनेट करतो. अशातच सोमवारच्या भागातही ‘बिग बॉस’च्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला आणि या नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील एकूण बारा सदस्यांपैकी सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. ‘बिग बॉस’ने नेमून दिलेल्या काही निकषांवर हा नॉमिनेशन टास्क पार पडला. सहाव्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अरबाज पटेल हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.  (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)

 ‘बिग बॉस’ने या घरातून नॉमिनेशनसाठी निर्णय क्षमता, खेळाची समज आणि मतप्रदर्शन हे तीन निकष नेमून दिले होते आणि या निकषांच्या आधारावर घरातील सर्व सदस्यांनी नॉमिनेशनचा टास्क पर पडला. सहावा आठवडा खूप कठीण असणार आहे असं ‘बिग बॉस’ने जाहीर केलं आहे. त्यानुसार हा आठवडा कठीण असल्याचे या टास्कवरुन दिसून आलं. नॉमिनेशन टास्कसाठी घरातील स्पर्धकांना बाहेर जाणाऱ्या सदस्यांचे फोटो असलेले पोस्टर फाडून ते कचऱ्याच्या पेटीत टाकायचे होते. घरातील नॉमिनेट सदस्यांची पोस्ट कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आली असून या पोस्टवर अनेक कमेंट्स आल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तू अक्कल शून्य”, जान्हवी-छोटा पुढारीमधील वाद विकोपाला, सतत अभिनेत्रीला चल निघ म्हणत राहिला पण…; चूक कोणाची?

कलर्स मराठीने नॉमिनेटेड सदस्यांची पोस्ट शेअर केली असून यावर नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये या नॉमिनेटेड सदस्यांबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. याच पोस्टवर अभिनेता व ‘बिग बॉस मराठी’चा माजी स्पर्धक पुष्कर जोगनेही कमेंट करत त्याचे मत व्यक्त केलं आहे. या पोस्टखाली कमेंट करत त्याने असं म्हटलं आहे की, “या आठवड्यात कदाचित घन:श्याम घराबाहेर पडेल आणि पुढच्या आठडव्यात डीपी म्हणजेच धनंजय पोवार”. पुष्करने शेअर केलेल्या या कमेंटला नेटकऱ्यांनीही अनेक कमेंट्स करत उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “मी बेकार गेम खेळणार”, अभिजीत-पॅडीला सूरजने स्पष्टच सांगतिलं, दोघंही समजूत काढत म्हणाले, “दहा वेळा विचार करुन…”

पुष्करने शेअर केलेल्या कमेंटवर एका नेटकऱ्याने डीपीला पाठींबा देत “पुष्कर डीपीदादा टाॅप 3 मध्ये येणार असा महाराष्ट्र म्हणतोय. त्यामुळे तुम्ही भविष्यवाणी न केलेली बरी”, “कोल्हापूर नाव माहीत आहे ना? डीपी दादा टॉप 5 मध्ये असणार” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. तसंच काही नेटकऱ्यांनी “कोण घरात राहणार आणि कोण बाहेर पडणार हे तुम्ही सांगू नका ते जनता ठरवेल”, “लोक ठरवतील डीपी व घन:श्याम कधी बाहेर जाणार? तुम्ही सांगायची गरज नाही” असं म्हटलं आहे. यापैकी काही कमेंटला पुष्करने उत्तरदेखील दिलं आहे. पुष्यरने “डीपी माझाही आवडता स्पर्धक आहे पण त्याने अजून चांगला गेम खेळला पाहिजे” असं म्हटलं आहे.

Tags: dhananjay powarghanshyam darawadepushkar jog
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Next Post
Mitali Mayekar Story Viral

खास सरप्राइज, जंगी स्वागत अन्…; खूप दिवसांनी बायको घरी येताच सिद्धार्थ चांदेकरचा आनंद गगनात मावेना, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.