Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या कॅप्टन्सी टास्क पाहायला मिळत आहे. कॅप्टन्सी कार्यामध्ये ‘टीम बी’तील सदस्यांची संग्रामवर नाराजी पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून एन्ट्री घेतलेला संग्राम मिस्टर इंडिया बनल्याचं दिसला. याबद्दल त्याला रितेशने सुनावलंदेखील. घरात आल्यावर पहिल्या दिवशी संग्राम अरबाजला भिडला होता. मात्र, त्यानंतर संग्रामही काही खास करताना दिसत नाहीय. टास्कमध्येही तो अरबाजविरोधात उभं राहताना किंवा संपूर्ण शक्तीनिशी टास्क खेळताना दिसत नाहीय. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील वाइल्ड कार्ड सदस्य संग्राम माइल्ड कार्ड निघाल्याने प्रेक्षकांची नाराजी पाहायला मिळत आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
अशातच बुधवारी झालेल्या टास्कमध्येही त्याने अरबाजबरोबर हातमिळवणी करत टास्कमध्ये पलटी मारली. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या कॅप्टन्सी टास्क सुरू आहे. यावेळी दोन ‘टीम ए’ व ‘टीम बी’ अशा टीम्स करण्यात आल्या. ‘टीम ए’मध्ये निक्की, अरबाज, वर्षा, सूरज आणि धनंजय हे सदस्य आहेत. तर, ‘टीम बी’मध्ये जान्हवी, संग्राम, अंकिता, अभिजीत आणि पंढरीनाथ कांबळे हे सदस्य आहेत. संग्राम अरबाजशी भिडून टास्कमध्ये आपला खेळ दाखवेल अशी अशा होती. पण तसं काह झालं नाही आणि याबद्दल त्याला अंकिता, पॅडी व अभिजीत बोलताना दिसत आहे.
पहिल्या फेरीत ‘ए टीम’कडून निक्की-अरबाज तर, ‘बी टीम’कडून जान्हवी-संग्राम खेळण्यासाठी जातात. मात्र, हा टास्क सुरु होण्यापूर्वी अरबाज संग्रामशी डील करतो. “पहिल्या फेरीत आम्ही तुला बाद करणार नाही तू आम्हाला करु नको” अशी डील यांच्यात होते. त्यामुळे अरबाज अगदी सहजपणे जान्हवी-संग्रामला अडवतो आणि यामुळे निक्की अंडी उचलून अंकिता व पंढरीनाथ यांच्या घरट्यात टाकते. संग्रामच्या या खेळाबद्दल त्याला विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देतो. यावेळी अंकिता त्याला असं म्हणते की, “तुम्ही अरबाजला तसं करु दिलं”. तर पॅडी त्याला “तू पहिल्या फेरीत गेला नसता तर कुणाला भिडणार होता” असं म्हणतात.
आणखी वाचा – Video : अमिताभ बच्चन बोलले चुकीचं मराठी, गायकाने दाखवून दिली चूक, माफी मागत पुन्हा मराठी बोलले आणि…
पुढे संग्राम असं म्हणतो की, “मी भिडणारच आहे, पण तुम्ही माझी टेस्ट घ्यायला म्हणून मला आधी पाठवता”. तेव्हा पॅडी पुन्हा त्याला असं म्हणतात की, “अरबाजसमोर तू नाही तर कोण जाणार? मी किंवा अभिजीत जाणार होतो का?” पहिल्या फेरीत तुला त्याने अडवलं पण नंतरही तू तेच केलंस”. पुढे अभिजीतही त्याला “अरबाजने तुम्हाला पूर्णच ब्लॉक केलं” असं म्हणतो. त्यामुळे अंकिता, पॅडी व अभिजीत यांच्या या बोलण्याला वैतागून संग्राम त्यांना असं म्हणतो की, “तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही माझ्यावर थोपवत आहात”.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील पहिला वाइल्ड कार्ड सदस्य संग्राम चौगुले टीम बीबरोबर राहून अरबाजला ताकदीमध्ये टक्कर देताना पाहण्याची इच्छा होती. पण, संग्राम दुसरा वैभव निघाल्याची प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. आता अरबाजशी टक्कर घेणारा वाइल्ड कार्ड म्हणून संग्रामला घरात एन्ट्री दिली पण, तोही अरबाजला भिडताना दिसत नाहीय. त्यामुळे संग्रामने प्रेक्षकांनी निराशा केली आहे.