शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi 5 : “कुणी विश्वास ठेवला नाही आणि…”, अभिजीतच्या बायकोने घरात आल्यावर व्यक्त केलं दु:ख, म्हणाली, “वाईट वाटलं”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 27, 2024 | 10:58 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates Abhijeet Sawant wife expressed displeasure over Team B behavior towards him.

Bigg Boss Marathi 5 मध्ये टीम बीच्या अभिजीतबरोबरच्या वागणुकीवर त्याच्या पत्नीची नाराजी, म्हणाली, “त्याच्यावर कुणी विश्वास ठेवला नाही”.

 Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात गुरुवारी ‘फॅमिली स्पेशल’ एपिसोड सुरू झालेला आहे. ‘कलर्स मराठी’ने अभिजीत सावंतच्या कुटुंबियांचा व्हिडीओ शेअर करत ही आनंदाची बातमी सर्व प्रेक्षकांना दिली. पहिल्यांदा, वर्षा उसगांवकर यांची बहीण मनीषा येतात आणि त्या घरातील सर्व सदस्यांची भेट घेतात. तिला पाहून वर्षाही खूप भावुक होतात. मग अभिजीतची पत्नी आणि त्याच्या मुली भेटायला येतात. त. यावेळी “मला त्याच्यावर २०० टक्के विश्वास आहे, तू कोणाचाही विचार करू नकोस, चांगला खेळ, संपूर्ण जनता तुझ्या पाठीशी आहे” असं शिल्पा म्हणजेच अभिजीतची पत्नी त्याला सांगते. तसंच मध्यंतरी बी टीमने अभिजीतबद्दल केलेल्या वागणुकीवर ती आपलं मत मांडते. (Abhijeet Sawant Wife On Team B)

अभिजीतची बायको डीपी यांना भेटायला जाते तेव्हा डीपी तिला असं म्हणतात की, “जरा त्याचे कान ओढा”. यावर अभिजीतची बायको असं म्हणते की, “त्याचे कान ओढायचे गरज नाही, तो जबरदस्त खेळत आहे. मला त्याच्यावर २०० टक्के विश्वास आहे. तो काहीच चुकीचे करु शकत नाही. तो त्याचा खेळ उत्तम खेळत आहे. कुणी कितीही काहीही बोलूदेत. तो माणूस म्हणून कसा आहेस हे प्रेक्षकांना आणि त्याच्या चाहत्यांना माहीत आहे. तुझा गेम अतिशय छान आहे. तसंच खेळत रहा, महाराष्ट्राची जनता तुला पाठींबा देत आहे. त्यामुळे तुझे मित्र आणि सर्व कुटुंबियांना तुझा गर्व आहे. लक्षात ठेव… तू सुद्धा इथे गेम खेळायला आला आहेस. तुला जे चुकीचे वाटेल तिथे तू ते बोल मग समोर कुणीही असुदेत. बाहेर तू अतिशय चांगला दिसत आहेस”.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – 27 September Horoscope : शुभयोगामुळे ‘या’ पाच राशींना होणार धनलाभ, नोकरी व व्यवसायात होणार नफा, जाणून घ्या…

पुढे ‘बिग बॉस’ निक्की व अंकिताला मोकळं करतात. तेव्हा अंकिता अभिजीतच्या बायकोला असं म्हणते की, “मी कुठे चुकत आहे का? मी त्याला कधीकधी ओरडते. हो किंवा नाही हे सांग फक्त”. यावर अभिजीतची बायको अंकिताला म्हणते की, “खरं सांगू, तू चुकत आहेस. प्रत्येकजण आपला हळवा कोपरा शोधत आहे. त्यानेदेखील तेच केलं. त्याला माहीत आहे त्याचं लग्न झालं आहे आणि त्याला दोन मुली आहेत. बाहेर पण कुणी काही चुकीचे दिसत नाही आणि तोसुद्धा काहीच चुकीचं करत नाहीय. तो ज्या क्षेत्रात आहे तिथे त्याच्या हजारो मैत्रीणी आहेत. त्यामुळे तो चुकीचे करत नाहीय आणि मला त्याच्यावर २०० टक्के विश्वास आहे”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “बाबा पहिल्यांदा मुंबईत आले”, वडिलांना पाहून अंकिता भावुक, बाप-लेकीचा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ समोर

यापुढे अभिजीतची पत्नी ‘टीम बी’बद्दल असं म्हणते की, “मला दु:ख या गोष्टीचे आहे की, त्याने ‘बी टीम’साठी अनेकदा खूप काही केलं. पण कुणीच त्याच्यावर विश्वास नाही ठेवला. अभिजीत खूप कमी मित्र बनवतो आणि त्याने इथे मित्र बनवले. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यावर कुणी विश्वास ठेवला नाही, याचे मला वाईट वाटले. पण नंतर सगळं ठीक झालं आणि आता मला आनंद आहे की, त्याने इथे तुमच्यासारखे चांगले मित्र बनवले आहेत”.                       

Tags: abhijeet sawantAbhijeet Sawant Wife Displeasurmentbigg boss marathi 5
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 dp and his father emotional

Bigg Boss Marathi : दोन महिन्यांनी लेकाला पाहून डीपीच्या वडिलांनाही रडू आवरेना, घट्ट मिठी मारत ढसाढसा रडले, 'त्या' कृतीने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.