शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “फक्त निक्कीच्या भोवती…”, अरबाज-निक्कीचा राडा पाहून सुप्रसिद्ध अभिनेत्याचा बाकीच्यांना टोमणा, म्हणाला, “फक्त गर्दी…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 28, 2024 | 12:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily update Utkarsh Shinde reacted on yesterday arbaaz patel fight see the details

Bigg Boss Marathi 5 च्या घरात अरबाजने केलेल्या राड्यावरुन उत्कर्ष शिंदेचा इतर स्पर्धकांना टोमणा

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व अल्पावधीतच लोकप्रिय झालं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्याच दिवसापासून प्रेमाचे वारे वाहू लागले होते. मात्र, आता जस-जसे दिवस पुढे जात आहेत, तसे सर्व सदस्यांचे खरे चेहरे समोर यायला लागले आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात टीम A मधील कायम एकमेकांना साथ देणारे अरबाज व निक्की आता वेगळे झालेले पाहायला मिळत आहे. निक्कीच्या विरोधात त्यांच्याच ग्रुपमधील सदस्य चक्रव्ह्यूहात बोलताना आढळले. त्यामुळे निक्कीने ग्रुप A सोडण्याचा निर्णय घेतला असून सध्या ती एकटीच खेळत आहे. त्यामुळे टीम A तुटला आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)

अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या भागात निक्कीममुळे अरबाजचा पारा चांगलाच चढला होता. निक्की व अभिजीत जेवण बनवत असतात, तेव्हा निक्की गालातल्या गालात हसत असते. ते पाहून अरबाजचा राग अनावर होतो आणि तो घरातील वस्तूंची आदळ-आपट करायला सुरुवात करतो. निक्की, अरबाजला “काय आहे हा बालिशपणा?” असं म्हणते. त्यावर अरबाज तिला म्हणतो, “तू मला हर्ट करतेय”. यावर त्यांच्यात मोठा वाद होतो. तेव्हा निक्कीही अरबाजला शांत करण्याचा प्रयत्न करते. मात्र अरबाजला तिच्या वागण्याचा भयंकर राग आलेला असतो. त्यामुळे रागाच्या भरात तो आदलाआपट करतो.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “माझ्यामुळेच तुला शिक्षा झाली”, जान्हवीच्या ‘त्या’ वक्तव्यानंतरही पॅडींनी का घेतली तिची बाजू?, म्हणाले, “मलाच वाईट वाटतं कारण…”

यामुळे घरातील वातावरण क्षणार्धात बदलून जातं. घरातील इतर सर्व स्पर्धक अरबाजला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. यामुळे निक्कीला आणखीनच राग येतो आणि ते सगळे त्याला भडकावत आहेत असं तिला वाटतं. कालच्या या राड्यावर ‘बिग बॉस मराठी’चा माजी स्पर्धक उत्कर्ष शिंदे याने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उत्कर्षने कालच्या भांडणाचा एक फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत असं म्हटलं आहे की, “बिग बॉसच्या घरात जे होतं ते फक्त निक्कीच्या अवतीभवती होतं. बाकी फक्त गर्दी”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातील ‘डोकं नसलेले’ व ‘फक्त भटकणारे’ हे चार स्पर्धक झाले नॉमिनेट, या आठडव्यात कुणाचा पत्ता कट होणार?

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात काल केलेल्या आदळआपटमुळे अरबाजला याची शिक्षा मिळाली आहे. त्याने वस्तूंची केलेली तोडफोड व रागाच्या तीव्रतेमुळे त्याला आता आगामी कॅप्टन्सी टास्कमध्ये सहभागी होता येणार नाही. ‘बिग बॉस’कडून अरबाजला त्याने केलेल्या चुकीची शिक्षा म्हणून कॅप्टन्सी पदासाठीची उमेदवारी काढून घेतली आहे. यामुळे अरबाजला खूप दु:ख होतं आणि तो रडायला लागतो.          

Tags: Arbaaz Patelbigg boss marathi 5utkarsh shinde
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Next Post
Aamir Khan On Wedding

"मला जोडीदार हवा आहे", वयाच्या ५९व्या वर्षी आमिर खान अडकणार का लग्नबंधनात?, म्हणाला, "आधीच्या दोन्ही पत्नी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.