शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “निक्की, अरबाज, जान्हवी, वैभव घाबरले आणि…”, सूरज चव्हाणचं मराठी कलाकारांकडून भरभरुन कौतुक, म्हणाले, “तुझ्या हिंमतीपुढे…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 17, 2024 | 2:32 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily update Suraj Chavan performance praised by Aastad Kale, Utkarsh Shinde and Jay Dudhane

Bigg Boss Marathi 5 मधील सूरज चव्हाणची खेळी पाहून भारावले मराठी कलाकार, सोशल मीडिया पोस्ट शेअर करत केलं कौतुक

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी ५’मधील एक नाव सध्या बरंच गाजतंय. या नावामुळे ‘बिग बॉस’चंही घर गाजवतंय आणि हे नाव म्हणजे गोलीगत फेम सूरज चव्हाण. गेल्या काही दिवसांपासून सूरज हा ‘बिग बॉस मराठी ५’मुळे बराच चर्चेत आला आहे. सुरुवातीपासून सूरजचा खेळ ही प्रत्येकाला आवडत आहे. त्याचप्रमाणे घरातले ज्याप्रमाणे त्याच्याशी वागत आहेत, त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्याची खेळी पाहून आणि त्याचा स्वभाव पाहून अनेकजण त्याच्याबद्दल आपपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत आणि त्याला पाठींबा देत आहेत. अशातच  आता सूरजसाठी उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे व मराठी अभिनेता अस्ताद काळेने खास पोस्ट शेअर केल्या आहेत. (Bigg Boss Marathi 5 Daily update)

अभिनेता आस्ताद काळे याने त्याच्या सोशल मीडियावर सूरजसाठी पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने पु.ल देशपांडे यांच्या हरी तात्या या व्यक्तिचित्राचा संदर्भ दिला आहे. आस्तादने त्याच्या या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “पु.ल देशपांड्यांच्या ‘हरी तात्या’ या व्यक्तीचित्रात एक भाग आहे.”हरी तात्यांनी कधी आम्हाला पैशाचा खाऊ नाही दिला. पण आमच्या लहानग्या जीवांमधे एक अभिमान मात्र भरला. इवल्याशा मनगटांमधे छोट्याशा मनगट्या बांधल्या. त्या हातांची मूठ बनवायचं शिक्षण नकळत दिलं. दुर्दैवानं ही मूठ प्रत्येकवेळी वळतेच असं होत नाही, पण अगदीच गरज पडली तर वळू शकेल, हा विश्वास आजही कुठेतरी वाटतो, तो हरी तात्यांमुळेच”. ‘सूरज चव्हाण’साठी त्याचं आयुष्यच या बाबतीत ‘हरी तात्या’ आहे. उगाच मनगटं परजत, मुठी आवळून फिरत नाही तो. पण वेळप्रसंगी तो मूठही आवळेल, आणि अंगावर आलेल्यांना शिंगावरही घेईल. हा खरा मराठी मातीतला काटक, कसलेला मावळा वाटतो.सूरज, मित्रा. तुला खूप यश लाभो”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “माझ्या हातावर तू जीव सोडलास आणि…”, आईला फोन करत ढसाढसा रडला पॅडी, म्हणाला, “यश बघायची वेळ आली तेव्हा…”

आस्तादबरोबर उत्कर्ष शिंदेने सूरजचं कौतुक केलं आहे. “निक्की, जान्हवी, अरबाज १, अरबाज २ (वैभव) तुला काय घाबरले राव. सूरज तुझ्या हिंमतीपुढे सगळे आज पाणीकम चाय वाटले. तुला शिंदेशाही सलाम”. तसंच जयनेही सूरजच्या खेळाचे कौतुक करत असं म्हटलं आहे की, “सूरज भावा तुला खूप खूप प्रेम, तुझा खेळ असाच चलाऊ राहुदेत. लढ भावा”. याचबरोबर त्याने पुढे असं म्हटलं आहे की, “बिग बॉस वैभवला आता बाहेर काढा. अरबाजसाठी सूरज एकटा पुरेसा आहे. वैभवला ज्यासाठी घेतलं आहे, ते सूरजच करत आहे”.

आणखी वाचा – बहिणीची पहिलीच मासिक पाळी, रक्त दाखवत सूर्या दादाकडे गेली अन्…; ‘लाखात एक आमचा दादा’चा ‘तो’ सीन पाहून प्रेक्षकांकडून कौतुक

दरम्यान, कॅप्टन्सी टास्कसाठी सूरज अरबाजबरोबर नडताना पाहायला मिळाला. त्याच्या या दमदार खेळीबद्दल अनेक कलाकारांनी व सूरजच्या प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. अनेकांनी कमेंट्स करत सूरजच्या गेमचं कौतुक केलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील खेळ समजून घेल्यानंतर सूरज आता खऱ्या अर्थाने मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे. शुक्रवारच्या भागात सूरजच्या खेळाने इतर स्पर्धकांनच्या नाकात दम आणला होता.

Tags: aastad kalebigg boss marathi 5jay dudhaneutkarsh shinde
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Next Post
Uorfi Jawed web series

उर्फी जावेदच्या जीवनावर आधारित वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित, जवळपास तीन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये नक्की काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.