Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’ आणि ‘बिग बॉस’च्या घरातील भांडणं ही प्रेक्षकांना काही नवीन नाहीत. ‘बिग बॉस’च्या घरात काहीना काही कारणावरुन वाद हे होतच असतात. या घरात दररोज कुणाचं ना कुणाचं तरी भांड्याला भांडलं लागतच आहे. त्यातच पहिल्या आठवड्यात निक्की आणि वर्षा उसगांवकर यांचा राडा झाल्यानंतर रितेशने तिची चांगलीच शाळा घेतली होती. त्यानंतर आता दुसऱ्या आठवड्यात जान्हवी आणि वर्षा उसगांवकर यांच्या राड्याची चर्चा झाली. त्यानंतर जान्हवीने ‘बिग बॉस’चा दूसरा आठवडा गाजवला. अशातच तिसऱ्या आठवड्याची सुरुवातही भांडणांनीच झाली. ‘बिग बॉस’च्या घरात काल निक्कीने तिच्या खाजगी वस्तूंना हात लावला. या कारणावरुन घरात धुमाकूळ घातला. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
‘बिग बॉस मराठी’च्या सोमवारच्या भागात पॅडी म्हणजेच पंढरीनाथ कांबळे यांनी निक्कीच्या कपड्यांच्या कंटेनरला हात लावला. यामुळे आपल्या खाजगी वस्तूंना हात लावल्याच्या रागात निक्कीने घरातील सर्वांच्या वस्तूंची नासधूस केली. यामुळे निक्कीने घरात खूपच कल्ला केला. यामुळे घरातील ज्या ज्या सदस्यांचे सामान निक्कीने फेकले होते. त्या त्या सदस्यांमध्ये खूपच राडा झाला. यावेळी सामनाच्या फेकाफेकीत निक्कीने चुकून इरीनाचेही समान फेकले. यामुळे ती चिडली आणि या चीडचीडमध्ये धनंजयने इरीनाला काहीतरी बोलले असल्याचं तिला वाटतं. त्यामुळे ती रागावून बाहेर येते.
यानंतर इरीना व धनंजय बाहेर येतात आणि घरात झालेल्या भांडणावरुन एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा इरीना त्याला “तू सर्वांसमोर मला खडूस म्हणाला. मला गर्व आहे असं तू म्हणाला” असं म्हणते. यावर धनंजयही तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो. इतक्यात तिथे वैभव येतो आणि त्या दोघांच्या संभाषणात सहभागी होतो. यावेळी वैभव इरीनाला धनंजयने तिच्याबद्दल काय म्हटलं आहे हे सांगतो. यावेळी धनंजय व त्याच्यात बाचाबाची होते. तेव्हा वैभव धनंजयला त्याची बोलण्याची पद्धत चुकीची असल्याचे म्हणतो. तेव्हा धनंजयही मी असं काही बोललो असेल तर मी इरीनाची माफी मागायला तयार आहे” असं म्हणतो.
आणखी वाचा – घरी जाण्यासाठी योगिताचा Bigg Boss कडे हट्ट, शोमधील त्रास अभिनेत्रीला सहन होईना, एक्झिट घेणार का?
नंतर वैभव धनंजयला “मला तुझ्याकडून या अपेक्षा नाहीत” असं म्हणतो. मग् धनंजय इरीनाला “माझ्या मनात तुझ्याविषयीच्या भावना या चांगल्याच आहेत” असं म्हणतो. त्याला हे बोलताना पाहून वैभव “आधी चूक करायची आणि नंतर समजूत काढत बसायचं” असं म्हणत तिथून निघून जातो. तसंच ‘बिग बॉस’च्या घरात इरीना व धनंजय यांच्यात चाललेल्या भांडणातही वैभव मध्ये पडला होता.