शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi 5 : “एक काळ इंडस्ट्री गाजवलेली…” सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची वर्षाताईंसाठी खास पोस्ट, म्हणाली, “लाज वाटते…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 4, 2024 | 10:42 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 actress Surekha Kudachi special post on Varsha Usgaonkar

Bigg Boss Marathi 5मधील वर्षा उसगांवकरांसाठी सुरेखा कुडची यांची खास पोस्ट

Bigg Boss Marathi 5 Update : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची सुरुवात ही भांडणांनी झाली. पहिल्या दिवसापासून घरात वाद होत आहेत. निक्की तांबोळी व वर्षा उसगांवकर यांच्यात पहिल्या दिवसापासूनच टोकाची भांडणं होत असल्याचं पाहायला मिळत आहे. निक्कीने वर्षा यांच्याशी केलेली वागणूक कुणालाच आवडलेली नाही. निक्की तांबोळी व वर्षा उसगांवकर यांच्यात भांडण होत असल्यामुळे व त्यांच्या भांडणातील निक्कीच्या असभ्य बोलण्यामुळे  वर्षा यांच्या चाहत्यांचा  व कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींचा संताप झाला आहे.  नुकत्याच पार पडलेल्या नॉमिनेशन प्रक्रियेत वर्षा उसगांवकरांचा उल्लेख निक्कीने “काळ्या मनाच्या मॅम, ब्लॅक हार्टेड” असा केला होता. त्यामुळे तिचे हे शब्द वर्षा उसगांवकर, त्यांचे अनेक चाहते व काही मराठी कलाकारांनाही आवडलेलं नाही.  (Surekha Kudachi special post for Varsha Usgaonkar)

याबद्दल अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, पुष्कर जोग, कोसजोरी शहाणे यांसह इतर अनेक कलाकार मंडळींनी वर्षाताईंच्या अपमानाबद्दल पोस्टशेअर करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले. अशातच अभिनेत्री सुरेखा कुडची यांनीही एका पोस्टद्वारे त्यांची भूमिका मांडली आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी वर्षाताईंना पाठींबा दिला असून निक्कीने त्यांच्याबरोबर केलेली वागणूक ही चुकीची असल्याचे म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Surekha Kudchi (@surekha_kudachi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : “एक नंबर भाऊ”, रितेश देशमुखच्या होस्टिंगवर कलाकारांसह प्रेक्षकही खुश, कौतुक करत म्हणाले, “अख्ख्या महाराष्ट्राला…”

या पोस्टमध्ये सुरेखा यांनी असं म्हटलं की, “‘बिग बॉस मराठी ५’ची आतुरेतेने वाट बघत होते. वर्षाताई आणि पॅडीला पाहून मनापासून आनंद झाला. पण काही स्पर्धक मराठी असून मराठी माणूस  व त्यांच्या मानसिकतेबद्दलबोलत होते हे पाहून वाईट वाटलं. मी स्वत: दाक्षिणात्य आहे, माझी भाषा कन्नड आहे. पण मला ओळख दिली ती या महाराष्ट्राने. आपल्या महाराष्ट्रात कलावंतांवर प्रेम करणारे, कलाकारांचा आदर करणारे प्रेक्षक आहेत. असं असताना ‘बिग बॉस’च्या घरात आपल्या वयापेक्षा दुप्पट वय असलेली, एक काळ मराठी इंडस्ट्री गाजवलेल्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा अपमान करतात तेव्हा वाईट वाटतं.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : अखेर ‘बिग बॉस’ने निक्कीचा माज उतरलावच, सर्वांसमोर वर्षाताईंची मागितली माफी, म्हणाली…

यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “मान्य आहे त्या घरात सगळेच सारखे आहेत आणि सगळेच स्पर्धक आहेत. पण बोलताना भान ठेवणं गरजेचे आहे. ३ महिन्यांचा खेळ संपला की, शेवटी माणूस म्हणून कसे आहात? हेच पहिलं जातं. आणखी एक म्हणजे आत्ता कुठे एक मालिका संपवून आलेले कलाकार जेव्हा आपल्या वरिष्ठ कलाकाराला पाण्यात पाहतो, त्यांच्यावर हसतो. हे पाहिल्यावर लाज वाटते. असो वर्षाताई उभा महाराष्ट्र तुमच्या बाजूने उभा आहे”.    

Tags: bigg boss marathi 5surekha kudachivarsha usgaonkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
Daljiet Kaur filed a complaint against her husband Nikhil Patel in the Mumbai Police.

निखिल पटेलविरुद्ध दलजित कौरची मुंबई पोलिसांत धाव, नवऱ्याविरुद्ध तक्रार दाखल, म्हणाली, “एका महिलेला या देशात...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.