शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आर्यावर अन्याय होत आहे”, ‘बिग बॉस’ने घेतलेल्या निर्णयावर प्रेक्षक नाराज, शो न बघण्याचा पवित्रा घेत म्हणाले, “आम्ही निषेध करतो की…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 15, 2024 | 4:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Aarya Jadhav elimination netizens expressed their displeasurement

Bigg Boss Marathi ने आर्याबद्दल घेतलेल्या निर्णयावर प्रेक्षक नाराज, शो न बघण्याचा घेतला निर्णय

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नियमभंग केल्यामुळे आर्या जाधवला घराबाहेर काढण्यात आलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात हिंसा करत मूलभूत नियम मोडल्यामुळे आर्याला घराबाहेर काढण्यात आलं आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की आणि आर्यामध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर आर्याने निक्कीला ‘मी तुला मारीन’ असं म्हटलं. त्यानंतर त्यांच्यातील वाद टोकाला गेला आणि आर्याने निक्कीवर हात उचलला. आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली. ‘बिग बॉस’च्या घरात निक्कीवर हात उचलून हिंसा केल्यामुळे आर्याला घराबाहेरचा रस्ता दखवण्यात आला आहे. घरातील इतर सदस्यांनी आर्याच्या हिंसेचं समर्थन केलं नाही, पण तिला तिची चूक समजावण्याचा प्रयत्न केला. (Aarya Jadhav Elimination)

आर्याला घराबाहेर काढण्यात आल्याच्या निर्णयावर अनेक चाहते मंडळी व प्रेक्षक नाराज झाले असून त्यांनी ‘बिग बॉस’ न बघण्याचा निर्णय घेतला आहे. कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी आपली मतं व्यक्त केली असून प्रत्येकाने आर्याला पाठींबा देत तिच्यावर अन्याय झाला आहे असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर देखील यांचे प्रतिसाद उमटताना दिसत आहेत.  “आर्याने जे केलं ते बरोबरच केलं”, “कोणीतरी निक्कीचं थोबाड फोडणं गरजेचं होतं”, “अख्खा महाराष्ट्र आर्याबरोबर आहे”,  “आर्यानी चुक केली, परत २ हाणायला पाहिजे होत्या”.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Video : मुलीला जन्म दिल्यानंतर दीपिका पदुकोणला रुग्णालयातून डिस्चार्ज, पती रणवीर व चिमुकलीसह घरी परतली अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल

याचबरोबर “आता आम्ही हा शो बघायचं बंद करणार”, “निक्कीचा ‘बिग बॉस’ चालू आहे”, “बाय बाय निक्की तांबोळीचा बिग बॉस”, “आर्याला जर बाहेर काढलं तर आम्ही बिग बॉस पाहणार नाही ही गोष्ट बिग बॉसने ध्यानात ठेवावी”, “निक्कीनं काय पण केलं तर चालतंय, पणं तेचं दुसऱ्याने केल्यावर चालतं नाही”, ‘आतापर्यंत निक्कीने काय काय नियम मोडलेत, तरी तिला काय शिक्षा नाही”, “बिग बॉसच्या एकतर्फी निर्णयाचा आम्ही निषेध करतो” अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

आणखी वाचा – Video : ‘आई कुठे काय करते’ फेम अरुंधतीने मुंबईत घेतलं स्वत:चं नवीन घर, व्हिडीओद्वारे दाखवली खास झलक, म्हणाली, “अनेक वर्ष जपलेलं स्वप्न…”

टास्क दरम्यान झालेल्या वादात आर्याने थेट निक्कीच्या कानशिलात लगावली. यानंतर पुन्हा एकदा निक्की मोठा हंगामा करताना दिसली होती. मला न्याय हवा, बिग बॉस आर्याला बाहेर काढा, असं निक्कीने म्हटलं होतं. त्यानंतर शनिवारच्या ‘भाऊचा धक्का’मध्ये आर्याला ‘बिग बॉस’ने घरातून तत्काळ बाहेर निघून जाण्याची शिक्षा दिली. अगदी कुणालाही निरोप देण्याची संधी न देताच आर्याला या घराच्या बाहेर काढण्यात आलं. यामुळे आता प्रेक्षक मंडळी प्रचंड संतापली आहेत.    

Tags: Aarya Jadhav eliminationAarya Jadhav elimination netizens displeasurementbigg boss marathi 5
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Majhi tujhi reshimgath serial fame actress myra vaikul aka pari blessed with brother

मायरा वायकुळला झाला भाऊ, आईने चिमुकल्याला जन्म देताच आनंद गगनात मावेना, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.