मराठीतला हँडसम हंक म्हणजे अभिनेता व मॉडेल जय दुधाणे. मॉडेलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात करणारा जय दुधाणे ‘बिगबॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाचा उपविजेता राहिला होता. त्यानंतर ‘गडद अंधार’ सिनेमा व एका म्युझिक अल्बममध्ये झळकला असून जय लवकरच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ सिनेमातही आपल्याला दिसणार आहे. (bigg boss marathi 3 jay dudhane)
याच जय दुधाणेवर सोमवारी (दि. १०) एक भयानक प्रकार घडला. अज्ञात चोरटयांनी जयच्या कारची काच तोडून त्याची महागातली बॅग लंपास केली. जयने आपली कार पार्किंग एरियात उभी करत एका ठिकाणी निघून गेला. नेमकी हीच वेळ साधत चोरट्यांनी जयच्या कारची काच फोडून आतमध्ये असलेली महागडी बॅग पळवली. (jay dudhane car broke)

जयने या घडलेल्या प्रकाराची माहिती आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर पोस्ट करत दिली. शेअर केलेल्या फोटोला “Glass down” असं कॅप्शन दिलं असून फोटोमध्ये कारच्या काचांचा अक्षरशः चुराडा झाल्याचे दिसतंय. त्याचबरोबर आणखीन एक कॅप्शन देत जयने आपल्या चाहत्यांना कार पार्क करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले. जय यात म्हणतो, “Guys I’m okay!! Thanks for checking on me. Someone broke my glass. Bag chori karke gaya lol…. Be aware when you park your cars!”