शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 18 च्या पहिल्या ‘विकेण्ड का वार’मध्ये सलमान खान व गुणरत्न सदावर्तेची धमाल, म्हणाले, “मी म्हटलं तर मुंबई चालू नाहीतर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 12, 2024 | 11:38 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bigg boss 18 weekend ka vaar

गुणरत्न सदवर्ते यांची वीकेंड का वार मध्ये धमाल

 ‘बिग बॉस १८’ सध्या खूपच चर्चेत आहे. या पर्वाचा पहिला आठवडा मोठ्या उत्साहात पार पडला. तसेच या पर्वातील पहिले नॉमिनेशनदेखील पार पडणार असून यामध्ये चाहत पांडे, मुस्कान बामणे, गुणरत्न सदावर्ते, करणवीर मेहरा व अविनाश मेहरा हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता यामधून कोणता सदस्य घराबाहेर पडणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच आता वीकेंड का वारमध्ये ‘तांडव की रात’ देखील पार पडणार आहे. यामध्ये सलमान खानबरोबरच मल्लिका शेरावत, तृप्ती डिमरी व राज कुमार यांच्याबरोबरच ‘लाफ्टर शेफ’मधील कलाकारदेखील दिसून येणार आहेत. भारती सिंह, कृष्णा अभिषेक व सुदेश लहरीदेखील दिसून येणार आहेत. (bigg boss 18 weekend ka vaar)

या पर्वाचा पहिलं ‘विकेंड का वार’ १२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सलमान पुन्हा एकदा त्याच्या हटके अंदाजात दिसणार आहे. ‘बिग बॉस’चे चाहते याची आतुरतेने वाटदेखील बघत आहेत. आशातच निर्मात्यांनी ‘विकेंड का वार’चा नवीन प्रोमो प्रदर्शित केला आहे. यांमदये घरातील सदस्य एकमेकांच्या चेहऱ्यावरील मुखवटा हटवताना दिसत आहेत.

आणखी वाचा- “तुमच्यातल्या सकारात्मकतेला मिस करु”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अमृता देशमुखची भावुक पोस्ट, म्हणाली, ” सवयच नाही…”

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

तसेच सलमान खान त्यांची शाळादेखील घेत आहेत. दरम्यान समोर आलेल्या प्रोमोमध्ये विवियन डिसेना व चाहत पांडे यांचे भांडण होताना दिसत आहे. याची एक झलक प्रोमोमध्ये बघायला मिळत आहे. तसेच गुणरत्न त्यांच्या हटके अंदाजाने प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसत आहेत.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : अहिल्यादेवी प्रीतम-दिशाच लग्न थांबवणार का?, तर गुंडाच्या तावडीतून आदित्य पारूची सुटका करेल का?

समोर आलेल्या प्रोमोमध्ये गुणरत्न व सलमान दिसून येत आहेत. एका एपिसोडमध्ये सरकार गुणरत्न यांनी त्यांना सरकार घाबरत असल्याचे सांगितले होते. त्यावरूनच सलमान त्यांना बोलताना दिसून येत आहेत. सलमान म्हणतो की, “गुणरत्न यांना खरंच सरकार घाबरते का?”, त्यावर गुणरत्न म्हणतात की, “मी एकदा म्हणालो की मुंबई चालू म्हणजे मुंबई चालू होते. आता माझी चलती आहे आणि हे मी सगळ्यांनाच ओरडून सांगेन”, त्यानंतर सलमान म्हणतो, “गुणरत्न खुश झाले”, त्यानंतर गुणरत्न मोठमोठ्याने हसू लागतात. सलमान व गुणरत्न यांच्यामधील संभाषणाने सेटवर व घरात एकच हशा पिकतो.    

Tags: bigg bossBigg Boss 18weekend ka vaar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 winner Suraj Chavan will be gifted with electronics item

वॉशिंग मशीन, एसी, टीव्ही ते फ्रीज...; सूरज चव्हाण झाला मालामाल, नामांकित कंपनीकडून भेटवस्तू

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.