शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 18 च्या स्पर्धकांची यादी समोर, शो सुरु होण्यापूर्वीच दोघांनी घेतली माघार, प्रेक्षकांमध्येही उत्सुकता

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 23, 2024 | 5:43 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss 18 salman khan show list of participating contestants are announced see the details.

Bigg Boss 18 मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावे जाहीर, कोण कोण सहभागी होणार? जाणून घ्या...

Bigg Boss 18 : टेलिव्हिजनवरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस हिंदी’ची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व संपल्यापासून सगळ्यांचं लक्ष ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाकडे आहे. यादरम्यान सलमान खान हे पर्व होस्ट करणार नसल्याचं म्हटलं जात होतं. पण काही दिवसांपूर्वी सलमान खान ‘बिग बॉसच्या १८’व्या पर्वाचं चित्रीकरण करताना पाहायला मिळाला. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या चाहत्यांना दिलासा मिळाला. अशातच आता ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या नावाची यादी जाहीर झाली आहे. ईशा कोप्पीकर आणि धीरज धूपर ‘बिग बॉस १८’मध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र या दोघांच्या नावाची चर्चा होऊनही त्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.(Bigg Boss 18 Contestant List)

अशातच ‘बिग बॉस १८’मध्ये आणखी काही कलाकार आहेत, ज्यांची नावं आता ‘बिग बॉस’ने निश्चित केली आहेत. यात निया शर्मा, शोएब इब्राहिम, न्यारा बॅनर्जी, शिल्पा शिरोडकर, मीरा देवस्थले, सॅली साळुंखे, शांती प्रिया, अविनाश मिश्रा, देब चंद्रिमा सिंघा रॉय आणि चाहत पांडे यांचा समावेश आहे. त्याचबरोबर शहजादा धामी, जान खान, करण वीर मेहरा, ऋत्विक धनजानी, करम राजपाल, पद्मिनी कोल्हापुरे आदी कलाकारांच्या नावांचीदेखील चर्चा होत आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – Bigg Boss Hindi मध्ये होणार अरबाज पटेलची एन्ट्री?, तिथेही हवी आहे निक्कीची साथ, म्हणाला, “आता महाराष्ट्र बघेल की…”

‘बिग बॉस १८’व्या पर्वाचा दमदार प्रोमो नुकताच समोर आला आहे. ‘कलर्स टीव्ही’च्या सोशल मीडियावर हा प्रोमो शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये सलमान खान यंदाच्या पर्वात काय विशेष असणार हे सांगताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे या पर्वात सदस्यांचं भविष्य ‘बिग बॉस’ पाहणार आहेत. यंदाच्या ‘बिग बॉस हिंदी’मध्ये काय थीम असणार आहे? हे स्पष्ट झालं आहे. टाइम का तांडव हे ‘बिग बॉस१८’व्या पर्वाचं थीम असणार आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या आधारे घरातील स्पर्धकांना विभागले जाणार आहेत. 

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “जाताना तो किडे करुन गेला”, अंकिताचे अरबाजबद्दल भाष्य, कोकण हार्टेड गर्ल असं का म्हणाली?

दरम्यान, सलमान खान ‘सिकंदर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे तो या सीझनचा होस्ट नसल्याची बातमी मध्यंतरी आली होती. पण आता त्याने या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत.  ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. रात्री ९ वाजता कलर्स आणि जिओ सिनेमावर हा बहुचर्चित ‘बिग बॉस’ पाहता येणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Tags: Bigg Boss 18Bigg Boss 18 Contestant ListBigg Boss 18 Newssalman khan show
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
Prabhakar More Daughter

लेकीवर जीवापड प्रेम करतात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरे, मुलगी दिसते इतकी सुंदर, म्हणाले, "खूप प्रेम…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.