शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 18 मध्ये कोणकोणते स्पर्धक असणार?, नावं समोर, कधीपासून सुरु होणार शो?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 13, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss 18 Contestants List

'बिग बॉस १८'मध्ये झळकणार या अभिनेत्री, नावंही आली समोर, मुनमुन दत्ता व दलजित कौरच्या नावाची चर्चा

Bigg Boss 18 Contestants List : टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय व यशस्वी रिॲलिटी शोपैकी एक म्हणजे ‘बिग बॉस’. सध्या ‘बिग बॉस मराठी’ या रिऍलिटी शोने साऱ्यांच्या मनावर राज्य केलं आहे. तर आतापर्यंत ‘बिग बॉस’ हिंदीचेही १७ सीझन खूप हिट झाले. यानंतर ‘बिग बॉस’च्या १८व्या सीझनची जोरदार तयारी सुरु असल्याचं कानावर येत आहे. त्याच वेळी, ‘बिग बॉस १८’च्या अपेक्षित स्पर्धकांची यादी देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार व्हायरल होत आहे. ‘बिग बॉस १८’साठी अनेक अभिनेत्रींची नावे समोर येत आहेत. तथापि, निर्मात्यांनी अद्याप कोणत्याही स्पर्धकाचे नाव उघड केलेले नाही.

‘बिग बॉस’ सीझन १८ चा भाग असणाऱ्या अनेक स्पर्धकांची नावे सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ची बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ता ‘बिग बॉस १८’ मध्ये ग्रँड एण्ट्री करणार असल्याची दाट शक्यता आहे. या शोसाठी अभिनेत्रीला विचारणा करण्यात आल्याचे बोलले जात आहे, मात्र अद्याप मुनमुन दत्ताकडून कोणतीही पुष्टी झालेली नाही. जर बबिता जी या रिॲलिटी शोमध्ये आली तर तिच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी असेल.

आणखी वाचा – “मालवणी मराठी भाषा नाही”, अरबाज-निक्कीच्या दाव्यावर सुप्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला, म्हणाला, “हे परप्रांतीय…”

View this post on Instagram

A post shared by ???????????????????????? ???????????????????? ????????‍♀️???? (@mmoonstar)

याशिवाय सोहेल खानबरोबर ‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री समीरा रेड्डी बद्दलही बातमी समोर आली आहे. ती ‘बिग बॉस १८’चा भाग बनू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. समीरा बऱ्याच काळापासून इंडस्ट्रीपासून दूर आहे, तरीही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. समीरा रेड्डीने ‘नो एंट्री’, ‘रेस’ व ‘दे दना दन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केली. ‘बिग बॉस १८’ मध्ये येण्यासाठी निर्मात्यांनी अभिनेत्रीशी संपर्क साधला आहे, आता समीरा सलमान खानच्या शोमध्ये येण्यास तयार होईल की नाही हे पाहणे बाकी आहे.

आणखी वाचा – “माझं लग्न, घटस्फोट न झाल्याचे माहित असूनही…”, दलजित कौरने केलेल्या आरोपांवर नवऱ्याची प्रतिक्रिया, म्हणाला, “पहिल्या नवऱ्याबरोबर तिने…”

तसेच, वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेल्या दलजीत कौरबद्दलही असेही बोलले जात आहे की, ही अभिनेत्री या शोमध्ये दिसणार आहे. याशिवाय शोमध्ये पूजा शर्मा, दीपिका आर्या, नुसरत जहाँ, सोमी अली देखील दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. असेही म्हटले जात आहे की, टीव्हीच्या सर्वाधिक मानधन घेतलेली अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि सुरभी ज्योती यांना ‘बिग बॉस १८’ साठी विचारण्यात आले होते परंतु दोन्ही अभिनेत्रींनी शोमध्ये जाण्यास स्पष्टपणे नकार दिला. सलमान खानचा शो ‘बिग बॉस’ नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोमध्ये दिसणाऱ्या स्पर्धकांमधील भांडणे व वाद खूप चर्चेत राहतात. रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस १८’ ५ ऑक्टोबरला प्रीमियर होणार आहे. अलीकडेच एका नवीन अपडेटमधून समोर आले आहे की ‘बिग बॉस १८’ ऑक्टोबरच्या पहिल्या शनिवारी लॉंच होणार आहे. मात्र, अद्याप अधिकृत तारखेबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

Tags: Bigg Boss 18Bigg Boss 18 Contestants Listmunmun datta
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
14 august 2024 Saturday daily horoscope marathi news bhavishyavani astrology 12 zodiac sign know more

14 August Horoscope : मेष, सिंह व कन्या राशीसाठी बुधवारचा दिवस कठीण,व्यवसायात तोटा होण्याची शक्यता, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.