शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आईचा आत्महत्येचा निर्णय अन् वडिलांवरील कर्ज ; ‘बिग बॉस १७’चा विजेता मुनव्वर फारुकीचा कौटुंबिक संघर्ष, जाणून घ्या…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 29, 2024 | 10:06 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
munawar faruqui mother

आईचा आत्महत्येचा निर्णय अन् वडिलांवरील कर्ज ; 'बिग बॉस १७'चा विजेता मुनव्वर फारुकीचा कौटुंबिक संघर्ष, जाणून घ्या...

Bigg Boss Season 17 Grand Finale Updates : ‘बिग बॉस १७’च्या पर्वाचा महाअंतिम सोहळा दणक्यात पार पडला. मुन्नवर फारुकी, अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी हे स्पर्धक ‘बिग बॉस’च्या अंतिम सोहळ्यात दाखल झाले होते. या अटीतटीच्या लढाईत ‘बिग बॉस’च्या विजेतेपद डोंगरीची शान मुन्नवर फारुकीने कमावलं. वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून मुन्नवरने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला तेव्हापासून स्पर्धक म्हणून उत्तम खेळी खेळात त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वाच्या ट्रॉफीवर अखेर मुन्नवरने आपलं नाव कोरलं आहे. मुन्नवरचा आजवरचा प्रवास काही सोप्पा नव्हता. आजवर त्याला त्याच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. एका वादग्रस्त स्टँड-अपमुळे मुनव्वर चर्चेत आला आणि स्टँड-अप कॉमेडीयन म्हणून लोकप्रिय झाला. गुजरातमधील छोट्याश्या खेडेगावातून आलेला मुन्नवरचा कठीण प्रवास फार कठीण आहे. मुन्नवर कंगना रनौतच्या लॉकअप शोचा विजेता देखील राहिला. त्यावेळी ‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुन्नवरने त्याच्या आयुष्याबद्दल भाष्य केलं होतं.

आणखी वाचा – Bigg Boss 17 Grand Finale : मुनव्वर फारुकी ठरला ‘बिग बॉस १७’चा विजेता, वाढदिवशी तमाम भारतीयांकडून मिळालं मोठं बक्षीस, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

‘लॉक अप’ या शोदरम्यान मुन्नवरने आपल्या आईबद्दल एक मोठा खुलासा केला होता. याविषयी बोलताना मुन्नवर म्हणाला, “माझी आई घर चालवण्यासाठी जे जमेल ते काम करायची, परंतु आमच्या घरात तिचा मान कुणीच ठेवला नाही. माझ्या बहिणीच्या लग्नासाठीसुद्धा माझं कुटुंब माझ्या आईलाच दोष देतं. माझ्या वडिलांवरही प्रचंड कर्ज होतं. अशी बरीच कारणं होती ज्यामुळे माझ्या आईने आत्महत्येसारखा मोठा निर्णय घेतला. माझी आई खूप खंबीर होती, तिला नेमकं काय होत आहे हे मी तिला विचारू शकलो नाही याची खंत मला आजही आहे”.

आणखी वाचा – Bigg Boss 17 Grand Finale : मनारा चोप्राचा प्रवास अखेर संपला, ‘बिग बॉस १७’मधून तिसरी स्पर्धक घराबाहेर, आता अंतिम निकालाची उत्सुकता

आर्थिक अडचणींमुळे मुन्नवरने लहानपणीच शिक्षणला रामराम करुन पैसे कमावायला सुरुवात केली. अगदी सामोसे विकण्यापासून त्याने काम केलं आहे. मुन्नवरची आई व आजी त्याला सामोसे बनवून द्यायची ते सामोसे एक स्टॉल लावून तो विकायचा. याशिवाय मुन्नवरने भांड्यांच्या दुकानात, तसेच गिफ्ट शॉपमध्येही काम केलं आहे.

Tags: bigg boss 17bigg boss 17 winnerentertainmentMunawar Faruquimunawar faruqui mothermunawar faruqui struggle
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Bigg Boss 17 Grand Finale Updates in Marathi

Bigg Boss 17 Grand Finale : "अखेर ट्रॉफी डोंगरीला आलीच…", 'बिग बॉस'चं विजेतेपद जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीची पहिली पोस्ट लक्षवेधी, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.