Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ च्या यंदाच्या पर्वाचा विजेता सुप्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी ठरला. डोंगराची शान असलेल्या मुनव्वरने ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. ‘बिग बॉस’च्या घरात मुनव्वर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे विशेष चर्चेत राहिला. ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर मुनव्वर फारुकी याने केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. मुनव्वरने त्याच्या एक्स गर्लफ्रेंड आयेशा खान व नाझीला बाबत भाष्य केलं आहे. मुनव्वर याने सांगितले की, “मला आता आयशा खानशी संपर्क साधायचा नाही”.
‘इन्स्टंट बॉलीवूड’ला दिलेल्या मुलाखतीत मुनव्वरने आयेशाबाबत भाष्य करत म्हटलं की, “नाही, मी आयेशाच्या संपर्कात राहणार नाही. जेव्हा मी बाहेर आलो, तेव्हा मला गोष्टी जाणवल्या आहेत. मी नेहमीच एक अशी व्यक्ती आहे जो गोष्टी सोडून देतो. पण, काही गोष्टी दूर करण्यासाठी, काही गोष्टींना योग्यवेळी पूर्णविराम देणं शिकलं पाहिजे. कदाचित या प्रवासात मी तेच शिकलो आहे आणि मला त्या गोष्टींवर काम करायचं आहे. ती माणसं मला महत्त्वाची आहेत वा ज्यांच्या जीवनात मला महत्त्व आहे त्यांच्याबरोबर मला आता जगायचं आहे.”
नाझिलाने केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मुनव्वर म्हणाला की, “मी काही पाहिले नाही, मला काही माहित नाही. मी आता जाऊन बघेन, त्यानंतर काय आहे ते मला कळेल. त्यापूर्वी मला याबाबत काहीच उत्तर देता येणार नाही आणि प्रतिक्रियाही देऊ शकणार नाही”. यानंतर मुनव्वरला विचारण्यात आले की तो नाझिलाशी बोलण्याचा प्रयत्न करणार का? यावर मुनव्वर म्हणाला, “मला माहीत नाही”.
मुनव्वरबद्दल अनुराग म्हणाला होता, “या गोष्टी समोर आल्यावर कदाचित मुलींना त्याच्याबरोबर सुरक्षित वाटणार नाही”. अनुरागच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुनव्वर म्हणाला, “ज्या व्यक्ती तुम्हाला आवडत नाही अशा व्यक्तीसाठी तुम्हाला काहीही सांगणे खूप सोपे आहे. मी अनेक मुलींसह वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. त्यांना माहित आहे की मी त्यांना किती सुरक्षित ठेवतो आणि मी किती आदराने वागतो. त्यामुळे मला वाटत नाही की असा कोणताही इतिहास आहे जो अनुरागचे शब्द बरोबर असल्याचं सिद्ध करेल. उलट माझे काम त्याला चुकीचे सिद्ध करेल. त्याच्या मताने मला काही फरक पडणार नाही” असंही तो म्हणाला.