कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस १७’ हा लोकप्रिय शो दिवसेंदिवस अधिकच रंजक व गंमतीदार होत चालला आहे. अनेक दिवसांपासून सुरु असलेला हा शो आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे घरातील स्पर्धकांमध्ये आता चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता घरात कोण कुणाचा मित्र आहे? आणि कोण कुणाचा शत्रू? हे घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनादेखील स्पष्ट झाले आहे. या शोमध्ये येणारे अनेक ट्विस्ट या शोची रंजकता आणखी वाढवत आहेत. अशातच आता शोमध्ये आणखी एका नवीन ट्विस्टची भर पडली आहे. (Bigg Boss 17 New Promo)
अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडली आहे. या शोमध्ये आल्यापासून ऐश्वर्या विकी जैन व अंकिता लोखंडेबरोबरच्या सततच्या भांडणांमुळे चर्चेत होती. मात्र आता ईशा मालवीयमुळे तिला घरातून बाहेर जावे लागणार आहे. ‘बिग बॉस’ने दिलेल्या अधिकाराचा वापर करून ईशाने ऐश्वर्याला शोमधून बाहेर काढले आहे. ईशाला घरातील अंकिता, अनुराग डोवाल व ऐश्वर्या यांपैकी कोणत्याही एका स्पर्धकाला ऐश्वर्याबरोबरच्या मतभेदांमुळे ईशाने तिला घराबाहेर काढले. यावेळी ती असं म्हणाली कि, “माझे घरात ज्या लोकांबरोबर जमत नाही, त्यांना मला घराबाहेर काढायचे आहे. त्यामुळे मी ऐश्वर्याला घराबाहेर काढत आहे.”
Tomorrow's Episode Promo: Isha chose Aishwarya as Rules Breaker of the house and thus Aishwarya got EVICTED. pic.twitter.com/8VwCRqfiTq
— #BiggBoss_Tak???? (@BiggBoss_Tak) December 23, 2023
आणखी वाचा – स्वानंदी-आशिष यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात, अभिनेत्रीने शेअर केला पहिला फोटो, म्हणाली “आता आणखी वाट…”
‘बिग बॉस १७’ मधून बाहेर पडल्यानंतर ऐश्वर्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्य ती म्हणत आहे की, “अचानक बिग बॉसने सांगितले की, तुमच्यासाठी दरवाजे उघडले आहेत. यामुळे मला धक्काच बसला. माझ्या मनात हा विचारच आला नाही की मी इतकं चांगलं करत आहेस तर मी ते का करत नाहीये किंवा मला ते का जमलं नाही?”
आणखी वाचा – गौतमी देशपांडेच्या मेहंदी सोहळ्यात बहीण मृण्मयीचीच हवा, जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, पाहा खास क्षण
दरम्यान, या व्हायरल व्हिडीओखाली एकाने कमेंट करत असे म्हटले आहे की, “बरं झालं ही बाहेर आली, हा अगदी योग्य निर्णय आहे.” तर दुसरा असा म्हणाला की, “हिने नीलचं डोकं खाल्लं होतं, आता नील त्याचा खेळ खेळू शकेल.” तर आणखी एकाने नाहीतर असे म्हटले की, “देवाचे आभार, ही बाहेर आली आहे” याचबरोबर तिच्या चाहत्यांनी ऐश्वर्या बाहेर आल्यामुळे नाराजीही व्यक्त केली आहे.