‘बिग बॉस १७’ हा रिऍलिटी शो विशेष चर्चेत राहिला. या शोमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने पती विकी जैन बरोबर सहभाग दर्शविला. सततची भांडण, प्रेम यांमुळे ही जोडी ‘बिग बॉस’च्या घरात चर्चेत राहिली. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतरही ही जोडी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेली पाहायला मिळाली. सोशल मीडियावरही अंकिता व विकी बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच दोघांनी इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Ankita Lokhande And Vicky Jain Hospitalised)
अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये हे जोडपे हॉस्पिटलच्या बेडवर असलेले दिसत आहेत. अभिनेत्रीच्या हातावर जखम झाली असून बऱ्याच दिवसांपासून तिचा हात फ्रॅक्चर असल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावरुन शेअर करणाऱ्या फोटोंमध्ये तिच्या हाताला बँडेज लावलं असल्याचं दिसलं. आता मात्र अंकिताने विकीबरोबर थेट हॉस्पिटलच्या बेडवरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोने चाहत्यांसाठी आता एक अस्वस्थ करणारी बातमी समोर आली आहे. अंकिता व विकी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असं अंकिताने पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये अंकिता तिचा पती विकी जैनबरोबर हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे. यावेळी अभिनेत्रीच्या हाताला दुखापत झाली आहे, आणि तिच्या हातावर प्लास्टर बांधलेले आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “आजारपण एकत्र आलं आहे”. या कॅप्शनवरुन तर विकीदेखील आजारी असल्याचं समोर आलं आहे. मात्र विकीला नेमकं काय झाले हे अद्याप समजू शकलेले नाही.
अंकिता लोखंडेच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात दिसली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी अशी कमाई करण्यात अपयशी ठरला. याशिवाय ती तिचा पती विकीबरोबर ‘ला पिला दे’ म्युझिक व्हिडीओमध्येही दिसत आहे.