छोट्या पडद्यावरील दमदार रियलिटी कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस’. नुकतंच याच्या १७व्या सीजनची धमाकेदार सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी स्पर्धकांमध्ये बरीच वादावाद पाहायला मिळाली. त्यामुळे या सीजनची उत्सुकता बरीच वाढलेली आहे. या पर्वातील स्पर्धक हा खेळ पुढे कसा खेळणार याबद्दल तर उत्सुकता लागूनच आहे. पण सध्या बिग बॉसच्या घरात कोणते नवीन पंगे पाहायला मिळत आहेत याकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे. ‘बिग बॉस १७’च्या दुसऱ्याच दिवशी मन्नारा चोपडा व ईशा मालवीय यांच्यात बरेच वाद झालेले पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी ‘बिग बॉस’च्या घरात भावनिक वातावरणही पाहायला मिळालं. जिग्ना वोरा व्हिडीओ दाखवला गेला त्याला बघून सगळेच भावनिक झाले. तर दुसऱ्या बाजूल अंकिता लोखंडे तिच्या नवऱ्यावर नाराज दिसून आली. (Big boss 17 malviya and mannara chopra fight)
दुसऱ्या दिवसाची सुरुवात ‘बिग बॉस’च्या स्वयंपाक घरापासून होते. जिथे मुनव्वर जेवण बनवताना दिसला. त्यानंतर बाहेर अंकिता तिचा नवरा विक्की चालत बोलताना दिसले. अंकिता विक्कीला बोलते, सगळा दिवस असाच निघून जातो. त्यावर विक्की अंकिताला बोलतो, मी या घरात सगळ्यात शांत माणूस आहे. तर दुसऱ्या बाजूला ईशा व अभिषेक एकत्र जेवताना दिसतात. पुढच्या भागात दुसऱ्याच दिवशी बिग बॉसने नॉमिनेशन टास्क दिला. जे ऐकून ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, विक्की जैन, सना सईद खान, अंकिता लोखंडेसह सगळ्या घरवाले चकित होऊन जातात.
आणखी वाचा – “निदान आज तरी…”, शशांक केतकरची रस्त्यावरील सिग्नलबाबत पोस्ट, म्हणाला…
अभिषेक कुमार व अरुण महाशेट्टी यांच्या बरीच जोरदार भांडणं पाहायला मिळतात. या भांडणाची सुरुवात तेव्हा होते जेव्हा सनी, अभिषेक व वरुण एकमेकांबरोबर बोलत असतात. तेव्हा अरुण सांगतो, तो जेव्हा बाथरुममध्ये असते व मुली त्यावेळी तिथे असतील तर तेव्हा तो खूप जास्त अस्वस्थ होतो. ही गोष्ट फार्टपर्यंत पोहोचते. हे त्याला आवडत नाही. मग त्या दोघांमध्ये भांडण सुरु होतात.
या एपिसोडमध्ये बघायला मिळालं अंकिता ईशासमोर विकीबद्दल सांगताना दिसते की, मी त्याला कधीही माझ्यापेक्षा कमी समजलं नाही. मी नेहमी त्याला माझ्याबरोबर घेऊन चालते. पण तो नेहमी दुसऱ्यांसमोर आपल्या लोकांना विसरतो. तो असाच आहे. पण मी नेहमी आपल्या माणसांना साथ देत आली आहे.