बिग बॉस १६ च्या ट्रॉफीवर पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनने जरी नाव कोरले असले, तरी प्रेक्षकांच्या मनात खरा विजेता हा ‘आपला माणूस शिव ठाकरेच आहे. बिग बॉस चा यंदाचा मानकरी शिव ठाकरे न झाल्याने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी नाराजगी दर्शविणाऱ्या अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. दरम्यान फक्त शिवच्या चाहत्यांमध्येच नव्हे तर हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटींमध्येही शिवची क्रेझ पाहायला मिळाली.
आपला माणूस म्हणत शिवने प्रेक्षकांसोबतच कलाकारांच्या मनावरही अधिराज्य गाजवले. बिग बॉसच्या ट्रॉफीपासून अवघे एक पाऊल दूर राहिलेल्या शिवने दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानले आणि विजेता ठरलेल्या एम सी स्टॅनच्या आनंदात सहभाग घेतला. शिवच्या मनाचा मोठेपणा हा प्रेक्षकांना अधिक भावला. (shiv thakare troll)
शिवचे अनेक चाहते असले तरी त्याला ट्रोल करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. नुकतेच शिव ठाकरेने त्याच्या शर्टला असलेल्या किंमतीच्या टॅगवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य करत आपले मत व्यक्त केले आहे. शिव ठाकरे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. बिग बॉस च्या घरातून बाहेर आल्यानंतर शिवने अनेक प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या. या मुलाखतीत शिव ठाकरेने विविध विषयांवर चर्चा केली. मुलाखती दरम्यान शिवने लाल आणि काळ्या रंगाचा चेक्स पॅटर्नमधील शर्ट परिधान केला होता. त्याच्या शर्टला असलेला किंमतीचा टॅग मात्र काढण्यास तो विसरला. यावरुन अनेक नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले.
====
हे देखील वाचा – मोठ्या स्टार सोबत चित्रपट,मोठ्या शो मध्ये इंट्री शिव ठाकरे ने सांगितले त्याचे आगामी प्रोजेक्ट्स
====
नक्की का होतोय शिव ट्रोल (shiv thakare troll)
मुलाखती दरम्यानचा व्हिडीओ जेव्हा शेअर करण्यात आला तेव्हा अनेकांनी या व्हिडीओवर शर्टाला असलेला किंमतीचा टॅग काढ, प्राईज टॅग काढ, अशा अनेक कमेंट केल्या. त्यावर आता शिवने उत्तर दिले आहे. शिवने नुकतीच एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. या शेअर केलेल्या स्टोरीमध्ये तो म्हणाला आहे की, “तुम्ही कधी तुमच्या कपड्यांवरील किंमतीचा टॅग काढायला विसरला आहात का? तुमच्याबरोबरही असं कधी काही घडलं आहे का? असं होतं भावा, अनेकदा होतं”, असं म्हटलंय. त्याबरोबर त्याने ‘मुलांच्या गोष्टी’ असा हॅशटॅगही त्या पोस्टमध्ये दिला आहे.

शिवने लवकरच एका मोठ्या चित्रपटात काम करणार असल्याची घोषणा केली आहे, आता तो कोणत्या चित्रपटात दिसणार आणि कोणत्या कलाकारासोबत झळकणार हे पाहणं रंजक ठरेल.