हास्यविर भारत गणेशपुरे यांच्या मातोश्री मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे (८३) याचे वृद्धापकाळाने निधन झालं आहे. गुरुवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी रहाटगाव येथे त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. सायंकाळी त्यांच्या मूळ गावी रहाटगाव येथेच त्यांचे अंत्यविधी करण्यात आले. आईच्या निधनाची बातमी कळताच भारत गणेशपुरे तात्काळ मुंबईहून कुटुंबासह अमरावतीला गेले आहेत. भारत गणेशपुरे यांचे भाऊ मनीष गणेशपुरे यांच्या घरी त्यांच्या मातोश्रींच्या अखेरचा श्वास घेतला.(bharat ganeshpure mother death)

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेले अभिनेते भारत गणेशपुरे मूळचे अमरावतीचेच आहेत. त्यांच्यातल्या कलेला वाव देण्यासाठी त्यांनी मुंबईत त्यांचा पुढचा प्रवास सुरु केला. गणेशपुरे कुटुंबियांना शुभेच्छा देणारा एक फोटो मात्र सध्या व्हायरल होतोय. या फोटोत ‘दिशा इंटरनॅशल आय बँके’च्या अधिकाऱ्यांसोबत गणेशपुरे कुटुंबीय दिसत आहेत. गणेशपुरे यांच्या आई मनोरमाबाई यांचे नेत्रदान करण्यात आले आहे. सूत्रांनुसार मनोरमाबाई यांचे नेत्रदान करण्यास दिशा ग्रूपचे सचिव स्वप्निल गावंडे आणि मुंबई येथील दिग्दर्शक विराग वानखडे यांनी प्रेरित केले आहे.
वाचा गणेशपुरे कुटुंबीयांचा धाडसी निर्णय – (bharat ganeshpure mother death)
गणेशपुरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. असे असताना गरजूंना या रंगीन जगाची सफर घडवून देण्याच्या उद्दात्त हेतूने गणेशपुरे कुटुंबीयांनी नेत्रदानास संमती दिली. संमती दिल्यानंतर ‘दिशा इंटरनॅशल आय बँके’च्या चमूने मनीष गणेशपुरे यांच्या निवासस्थानी पोहचून नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान तेथे ‘दिशा ग्रूप’चे सचिव स्वप्निल गावंडे, डॉ. मनीष तोटे, हिमांशू बंड, अंकुश आंबेडकर यांची उपस्थिती होती. नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल ‘दिशा इंटरनॅशनल आय बँके’च्या अध्यक्ष कुंदा अरूण गावंडे, स्वप्निल गावंडे यांनी गणेशपुरे कुटुंबीयांचे आभारही मानले.(bharat ganeshpure mother death)
====
हे देखील वाचा – ‘त्याने स्वीकारलं नाही तर तुझ्या होणाऱ्या बाळाला माझं नाव दे’ मैत्रिणीसाठी सतीश यांनी उचललेलं मोठं पाऊल
====
गणेशपुरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही त्यांनी उचलेल हे मोठं पाऊल नक्कीच दाद देण्यासारखं आहे. आजकाल या दुनियेत असा विचार करणारी लोक फार कमी पाहायला भेटतात. गणेशपुरे यांच्या आई मनोरमाबाई गणेशपुरे यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.