भाग्य दिले तू मला या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे पात्र कोणतंही असो प्रेक्षकांकडून कौतुकाचा हक्क सगळ्यांना मिळाला आहे. खूप कमी मालिका अशा असतात ज्या कमी काळात प्रेक्षकांच्या जवळ पोहचतात भाग्य दिले तू मला हि मालिका याच यादीत येते. सध्या मालिकेत राज कावेरीच्या लग्नाचा ट्रॅक पार पडला. बऱ्याच अडचणींचा सामना केल्या नंतर अखेर राज कावेरीचं लग्न अगदी थाटात पार पडलं. आता मात्र एक नवीन संकट राज कावेरी समोर आल्याचं दिसत आहे.(bhagya dila tu mala update)

मालिकेत एक महत्वाचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ याही या मालिकेचा महत्वाचा घटक आहेत. त्या साकारत असलेलं रत्नमाला हे पात्र देखील प्रेक्षकां चांगलंच आवडलं आहे. पण मालिकेत रत्नमाला यांची ढासळत चाललेली प्रकृती वरून आता रत्नमाला हे पात्र प्रेक्षकांचा निरोप घेणार का याची भीती प्रेक्षकांना आहे. नुकताच कलर्स मराठी वाहिनी ने पोस्ट केलेल्या प्रोमो मध्ये रत्नमाला यांची प्रकृती पुन्हा गंभीर झाल्याचं दिसतं आहे.
====
हे देखील वाचा- भाग्य दिले तू मला मालिकेत नवीन वळण प्रेक्षकांचं आवडतं पात्र घेणार मालिकेतून निरोप?
====
तर खर्च रत्नमाला या मालिकेचा निरोप घेणार का? या बद्दल प्रेक्षक संभ्रमात दिसत आहेत.तर रत्नमाला यांनी निरोप घेतल्या नंतर राज कावेरीवर कोणतं नवीन संकट येणार आणि ते दोघे परिस्थतीचा कसा सामना करणार हे पाहन रंजक ठरणार आहे.(bhagya dila tu mala update)

मालिका विश्वात येणाऱ्या प्रत्येक मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतो. काही मालिकांकडे शिकण्याच्या दृष्टिकोनाने बघून तर काही जण केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने पाहतात. अल्पावधीत प्रसिद्धीस उतरलेल्या मालिका जिव्हाळ्याचा विषय बनतात. त्यामुळे त्यातील एखादया पात्राचा निरोप ही प्रेक्षकांना पाहवत नाही. तर आता मालिकेत नक्की पुढे काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.