मालिका विश्वात सध्या काही आघाडीच्या मालिका आहेत ज्या प्रेक्षक दररोजच्या आयुष्यात न चुकता पाहत असतात. या मालिकांमधील प्रत्येक पात्रावर तेवढच भरभरून प्रेम प्रेक्षकांकडून केलं जात. मालिकांच्या यादीतील भाग्य दिले तू मला या मालिकेवर देखील प्रेक्षकांचा असाच आशीर्वाद राहीला आहे. मालिकेतील आवडती जोडी राज कावेरी म्हणजेच अभिनेत्री तन्वी मुंडले आणि अभिनेता विवेक सांगळे त्यांच्या पात्रांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. बरीच दिव्य पार केल्या नंतर राज कावेरीच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचे दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार होते. पण आनंदात लग्न सोहळा पार पडल्या नंतर रत्नमाला यांच्या आजाराचं मोठं संकट राज कावेरी पुढे आलेलं आहे. पण अजूनही या संकाटच निराकरण करणं राज कावेरीला शक्य झालं नाही.(Bhagya Dile Tu Mala New Entry)

मालिकेच्या आता पर्यंतच्या कथानकात रत्नमाला यांची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चाललेली असताना त्यांचा जीव वाचविण्यासाठी किडनी डोनरची आवश्यकता असल्याचं डॉक्टर सांगतात. राज कावेरीसह घरातील इतर सदस्य देखील किडनी डोनरच्या शोधात दिसतात. पण सगळ्यांना अपयश येत. शेवटी राज कावेरीच्या आयुष्यात पुन्हा एकदा वैदेही येते आणि ती किडनी देण्यासाठी तयार होते पण राज ने माझ्याशी लग्न केलं तर किडी देईन असं ती सांगते.पण राज या गोष्टीला विरोध दर्शवतो. पुन्हा एकदा रत्नमाला यांच्या काळजीने सगळे चिंतेत पडतात.
====
हे देखील वाचा – 3 Idiots मधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाच्या प्रयोगाला हजेरी
====
मालिकेच्या आजच्या भागात डॉक्टर डोनर मिळाला असल्याचे राज कावेरीला सांगतात. रत्नमाला यांचे प्राण वाचू शकतात अशी अशा पुन्हा पल्लवित होते. नक्की कोण आहे हे पंख्यासाठी राज कावेरी यांच्या सह सगळे कुटुंब धाव घेतात. पण त्या व्यक्तीला पाहून सगळे आश्चर्य चकित झाल्याचे दाखवण्यात आले हे. तर आता नक्की हि नवी व्यक्ती कोण असणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. हि व्यक्ती वैदेहीच असणार कि अजून कोण? मालिकेत नवीन कलाकाराची एन्ट्री होणार का? रत्नमालाची जागा घेण्यासाठी आणखी कोणाची एन्ट्री होणार का हे जाणून घेण्याची आतुरता प्रेक्षकांना लागली आहे.(Bhagya Dile Tu Mala New Entry)

तर मालिकेत आता काय घडणार राज कावेरीची हि अवस्था कधी संपणार? रत्नमाला कधी बऱ्या होणार हे मालिकेच्या येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.