Shubhangi Atre on Ex Husband : अभिनेत्री शुभांगी अत्रे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेली पाहायला मिळाली आहे. शुभांगीने आजवर अनेक मालिकांमधून रसिकांच्या मनात घर केलं. मात्र शुभांगीला ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. याशोमध्ये, शुभांगीने साकारलेल्या अंगुरी भाभीच्या भूमिकेने रसिकांच्या मनात घर आहे. मालिका संपल्यानंतरही शुभांगीला अंगुरी भाभी या नावाने ओळख मिळाली. शुभांगी आजकाल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलीकडेच, ती तिचा पूर्वाश्रमीचा पती पीयूष पूरेबद्दल बोलताना दिसली.
आता सिद्धार्थ कनन यांच्याशी झालेल्या संभाषणात शुभांगी म्हणाल्या, “लग्नानंतर मला पियुशच्या मद्यपान करण्याच्या सवयीबद्दल कळले. मी लग्न टिकवण्याचा खूप प्रयत्न केला. आम्ही १७ वर्षे एकत्र राहिलो. कारण मी काम करायचे आणि त्यानंतर गोष्टी कधी खराब झाल्या हे मला ठाऊक नाही. माझी मुलगी आशी तिच्या नेहमी मला वडिलांच्या मद्यपानाबद्दल सांगायची. मद्यपान केल्यावर तो चिडचिड करायचा. जेव्हा मी घरी राहिले आणि माझ्या डोळ्यांनी स्वत: पाहिले. तेव्हा कोविड हा हे काळ होता जेव्हा मी घरी राहून हे अनुभवले”.
शुभांगी पुढे म्हणाली, “२०१८ मध्ये तो प्रत्यारोपणाचा उपचार म्हणून स्टिरॉइड्स घेत होता आणि यामुळे त्याने मद्यपान करण्यास सुरुवात केली. या कारणास्तव, त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला जीवनशैली बदलण्यास सांगितली. त्यावेळीही, शुभांगीने लग्न वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पुनर्वसनासाठी जाण्यासाठी मी दोन वर्षांपासून पीयूषच्या मागे लागले आणि त्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर २०२० मध्ये आम्ही विभक्त झालो. तो मानसिकदृष्ट्या प्रभाव पाडत होता. घटस्फोटानंतरही मी त्याला आर्थिक पाठिंबा देत होते हे माहित असूनही त्याने मद्यपान थांबवले नाही”.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’च्या जेठालालचा ओळखणंही झालेलं कठीण, ३३ वर्षांपूर्वीचा फोटो समोर, दीड महिन्यात तब्बल…
जेव्हा शुभांगीला विचारले गेले की, तू तुझ्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला मिस करत आहेस का?, याचे उत्तर देण्यावेळी ती भावुक झालेली दिसली. भावुक होत ती म्हणाली, “कधी कधी”.





