प्रत्येक कलाकाराचं वर्किंग प्रोसेस हे त्याच्या सवयीनुसार असत. सीन दरम्यान एखाद्या पात्राचा अभ्यास करताना त्या पात्राशी संवाद साधन, त्याच निरीक्षण करण, वा स्वतःच्या भूमिकेचा सखोल अभ्यास करणं अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्या एक कलाकार हाताळतो. अशातच बाईपण भारी देवा चित्रपटातील एका कलाकाराची एखादी भूमिका हाताळण्याची एक वेगळीच पद्धत समोर आली आहे. ही कलाकार दुसरी तिसरी कोणी नसून रोखठोक, हजरजबाबी व्यक्तिमत्व असणारी अभिनेत्री म्हणजे वंदना गुप्ते. (Baipan Name Story)
एक कलाकार म्हणून नेहमीच त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या बाबतीत कसलीच कमतरता पडू दिली नाही. अशातच वंदना गुप्ते या त्यांच्या भूमिकेशी एकरूप होऊन त्या भूमिकेशी कसं वर्किंग करायच्या या बाबतच गुपित समोर आलं आहे. बाईपण भारी देवाच्या दिग्दर्शन टीमच्या एका व्यक्तीने नुकतीच इंस्टाग्राम अकाऊंटवरून वंदू ताईंची वर्किंग स्टाईल शेअर केली आहे. ही पोस्ट केदार शिंदे यांनी रिपोस्ट देखील केली आहे.
पाहा काय होत बाईपण चित्रपटाचं आधीचं नाव (Baipan Name Story)
या पोस्ट मध्ये त्याने स्क्रिप्ट ठेवली आहे, आणि त्यावर काही नोट्स काढलेल्या दिसत आहेत. वंदू ताई त्यांच्या भूमिकेच्या, त्यांच्या सीनच्या महत्वाच्या नोट्स या लिहून ठेवत आणि त्यानुसार काम करत. बरं या स्क्रिप्ट वर मंगळागौर असं नाव दिसतंय, यावरून हे कळतंय की बाईपण भारी देवा हे चित्रपटाचं नाव ठेवण्याआधी या चित्रपटाचं नाव मंगळागौर करण्यात आलं आहे.(Baipan Name Story)
हे देखील वाचा – बाईपण चित्रपटामुळे फिमेल फॉलोवर्स वाढले!

या पोस्ट वर असं लिहिलं आहे की, हे वंदू मावशीच स्क्रिप्ट होतं, तेव्हा बाईपण भारी देवा चं, वर्किंग टायटल मंगळागौर होतं म्हणून यावर ते नाव आहे, पण वर दिसणाऱ्या गुलाबी पताकांची तिची कलाकुसर तिची आहे, हे तीच वर्किंग आहे, ही तिची वर्किंग स्टाईल आहे, प्रत्येक सीन का घडतो..कुठे घडतो, ह्याचे तिचे तिचे नोट्स. प्रत्येक नव्या कलाकाराला यातून शिकण्यासारखं नक्कीच काहीतरी आहे. हीच मेहनत. हेच डेडिकेशन आपल्या प्रत्येक कामात आणायला हवं हे बाईपणने शिकवलं.(Baipan Name Story)
प्रत्येक कलाकारच वर्किंग स्टाईल, त्याच डेडिकेशन हे नक्कीच शिकवण्यासारखं असत यांत दुमत नाही.
