शनिवार, ऑगस्ट 29, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दुसऱ्यांदा बाबा झाला सुप्रसिद्ध गायक, आनंद साजरा करत शेअर केली खास पोस्ट, म्हणाला, “आयुष्यात पुन्हा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 20, 2025 | 10:15 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
B Praak second baby

दुसऱ्यांदा बाबा झाला सुप्रसिद्ध गायक, आनंद साजरा करत शेअर केली खास पोस्ट, म्हणाला, "आयुष्यात पुन्हा…"

B Praak second baby : प्रसिद्ध गायक बी प्राक सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याच्या आयुष्यात एका नवीन आनंदाने दार ठोठावले आहे. तो पुन्हा एकदा बाबा झाला आहे. ही आनंदाची बातमी त्याने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह शेअर केली, त्यानंतर अभिनंदनाचा फेरा सुरु झाला आहे. बी प्राक यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगितले की, त्यांच्या घरी १ डिसेंबर रोजी एका मुलाचा जन्म झाला. या पोस्टमध्ये तिने बाल कान्हाचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये आजूबाजूला गायीही दिसत होत्या.

याबरोबरच त्यांनी आपल्या नवजात मुलाच्या नावाचेही अनावरण केले आणि आपल्या मुलाचे नाव ‘द्विज बच्चन’ असे ठेवल्याचे सांगितले. बी प्राक यांनी या आनंदाचे श्रेय भगवान कृष्णाच्या कृपेला दिले आणि आपल्या जीवनाच्या या नव्या सुरुवातीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या आनंदाच्या प्रसंगी बी प्राकने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सर्व आहे राधे राधे. जय श्री कृष्ण”.

आणखी वाचा – “१७ वर्षे माझा साथीदार…”, लाडक्या श्वानाच्या निधनानंतर बांदेकर कुटुंब दुःखात, सोहम भावुक होत म्हणाला, “आता माझ्यासोबत…”

View this post on Instagram

A post shared by B PRAAK (@bpraak)

या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला सतत शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताने कमेंटमध्ये हार्ट इमोजी पाठवला, तर भोजपुरी इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंगने कमेंटमध्ये ‘अभिनंदन’ असे लिहिले. त्यांच्या पोस्टमध्ये बी प्राक यांनी त्यांच्या मुलाच्या नावाचा अर्थही स्पष्ट केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की ‘द्विज’ म्हणजे दोनदा जन्म घेणे, ज्याचा त्यांनी आध्यात्मिक पुनर्जन्माशी संबंध जोडला. त्यांनी लिहिले, “आम्ही १ डिसेंबर २०२५ रोजी आमच्या मुलाचे स्वागत केले आहे. राधे-श्यामच्या कृपेने आयुष्यात पुन्हा एकदा प्रकाश, आशा आणि नवी सुरुवात झाली आहे. हृदय आनंदाने आणि कृतज्ञतेने भरले आहे आणि हा क्षण माझ्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही”.

आणखी वाचा – भाजीवालीची भूमिका करायला मराठी अभिनेत्रीच का?, ‘तारक मेहता…’ सोडण्यामागचं अभिनेत्रीने सांगितलं कारण, म्हणाली, “भावनांचा आदर…”

बी प्राक आणि मीरा यांचे ४ एप्रिल २०१९ रोजी लग्न झाले. लग्नानंतर, २०२० मध्ये, दोघेही एका मुलाचे पालक झाले, ज्याचे नाव अदब आहे. २०२२ मध्ये, जन्मानंतर लगेचच त्यांनी त्यांचे दुसरे मूल गमावले. नवजात मुलाच्या मृत्यूमुळे गायक आणि त्यांची पत्नी दोघांनाही मोठा धक्का बसला. अशा परिस्थितीत, त्यांच्या घरात नवीन मुलाच्या आगमनाने त्यांच्यासाठी भावनिक शांतता आणि नवीन आशा आली आहे.

Tags: B Praakbollywood singerentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
 Kuku kohli death
Entertainment

ज्येष्ठ चित्रपट निर्मात्यांचे निधन, दोन दिवसांपूर्वी आला हृदयविकाराचा झटका, बॉलिवूडला दिले हिट मुव्ही

ऑगस्ट 26, 2026 | 11:12 am
Next Post
Kamali Promo Shocking Twist

कामिनीचा डाव कमळीच्या जीवावर बेतणार, जीव गमावणार आणि…; मालिकेत धक्कादायक TWIST

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.