सांगीत क्षेत्रात आपली अशी एक वेगळी छाप पाडणारे गायक, संगीत दिग्दर्शक म्हणजे अवधूत गुप्ते.अवधूत गुप्ते त्यांच्या स्पष्टवक्तेटेपणामुळे देखील विशेष ओळखले जातात, संगीत क्षेत्रात त्यांचं जितकं नाव आहे, तितकंच ‘खुपते तिथे गुप्ते’ या त्यांच्या शोला देखील कायमच पसंती मिळताना पाहायला मिळते आहे.खुपते तिथे गुप्तेच्या आधीच्या २ सिजनला जितकं प्रेक्षकांचं प्रेम मिळालं तितकंच प्रेम आता सुरु असणाऱ्या सिजनला देखील प्रेक्षकांनी उचलून धरलं आहे. या शो मध्ये येणाऱ्या कलाकार पाहुण्यांना अवधूत गुप्ते त्यांना कोणत्या गोष्टी खुपतात या बदल विचारतात, पंरतु सध्या अवधूत गुप्तेंना एक गोष्ट खुपते आहे. (avdhoot gupte viral video)
पाहा नेमकं काय घडलं? (avdhoot gupte viral video)
त्यांच्या घरात माकडं शिरलं आहे, त्या बदलाचा एक व्हिडिओ त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे,त्या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये त्यांनी म्हंटल आहे, अहो गुप्ते .. तुम्हाला काय खुपते?
तर सध्या आम्हाला दररोज सकाळी उठून बघायला मिळणारी एक “माकड चेष्टा” खुपते!!????व्हिडिओमध्ये दिसणारी ही माझी आई. हीचंच आम्ही दोन वर्षांपूर्वी लंग ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन केलंय. तर, तिच्या नाकावर टिच्चून घरात येऊन केळी पळवणारा (पळवणारा कुठला.. तिथेच बसून खाणारा!) आणि तिच्याच अंगावर धावून जाणारा हा हुप्प्या बघा!हा त्रास आमच्या बोरिवलीतल्या श्रीकृष्ण नगर मधल्या प्रत्येक रहिवाशाला आता असह्य झाला आहे! अनेकांनी वनखात्याकडे तक्रार देखील केली आहे. वनखाते देखील काही उपाययोजनांचा विचार नक्कीच करत असेल, ह्याची मला खात्री आहे.
‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान‘ हे बाजूलाच असल्यामुळे, विविध पक्षी- प्राण्यांच्या भेटी हे खरंतर आमच्या श्रीकृष्णनगरचे आभूषण. आम्ही हे वर्षानुवर्षांपासून मिरवत देखील आलो आहोत. पण, माकडांचा त्रास हा कोरोना पश्चात कित्येक पटींनी वाढला आहे, हे मात्र खरं! .. आणि ह्याचं खरं कारण म्हणजे “त्याआधी वर्षानुवर्षे उद्यानात फिरायला गेलेल्या आपण सगळ्यांनी ह्याच माकडांना खायला दिलेली केळी, वडापाव, पॉपकॉर्न आणि लेज्!”ही माकडं पिढ्यानपिढ्यापासून आता ‘शंभर टक्केच्या वन्य जीवनाला‘ मुकली आहेत. झाडावर राहतात, तरी टाकीवरच्या पत्र्याखाली झोपतात. आमच्याच झाडावरच्या तुत्या, जाम, आंबे, पेरू वगैरे फळे काढून खातात सुद्धा. पण, ते केवळ हौसे खातर! बाकी.. सकाळी घरांच्या खिडक्यातून चपात्या लाटण्याचे आवाज आणि फोडण्यांचा वास सुटला, की खिडकीच्या जाळ्यांवर येऊन ओरडा आरडा करून हक्काने हे सर्व पदार्थ मागतात. (avdhoot gupte viral video)
माकडं यायची. कोरोना आधी सुद्धा यायची. पण, महिन्या-दोन महिन्यातून चुकून भरकटत आलेली अशी. करोना काळात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांना जायची परवानगी बंद झाली आणि त्याबरोबरच बंद झाला ह्या माकडांचा खुराक. मग ह्या वेळेस तो खुराक शोधत ती इथे आली आणि मग इथलीच झाली. आता ती इथेच राहतात आणि छळतात!बाकी स्ट्रगल चालूच राहील.. फक्त ह्यापुढे तुम्ही कुठेही फिरायला गेलात आणि माकड दिसल्यावर त्यांना काही बाही खाऊ द्यायला तुमचा हात किंवा मुलं पुढे सरसावलीच.. तर हा व्हिडिओ नक्की आठवा! एवढेच काय ते.. शुभ दिवस! अनेक कलाकारांनी देखील त्यांच्या या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.