रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पतीबरोबर मी घटस्फोट न घेता…”, लग्नावरुन आशा भोसलेंनी केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या, “अडचणी असताना…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 24, 2024 | 3:14 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Asha Bhosle Worried About Divorce

तरुण पिढीतील घटस्फोटाचं वाढत प्रमाण पाहून आशा भोसलेंनी सांगितला अनुभव

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी तरुण पिढीतील घटस्फोटाच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. अलीकडेच आशा यांनी अध्यात्मिक नेते रविशंकर यांच्याशी संभाषण केलं त्यावेळी तिने त्यांना त्यामागील कारण विचारले आणि तरुण जोडप्यांमधील प्रेम इतक्या लवकर कमी होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. आशा भोसले यांनी असेही सांगितले की, त्यांच्या पतीबरोबरसमस्या असतानाही त्यांनी त्यांचे लग्न मोडण्याचे कठोर पाऊल कधीही उचलले नाही. (Asha Bhosle Worried About Divorce)

आशा भोसले म्हणाल्या, “माझ्या पतीबरोबरही अडचणी होत्या पण मी माझ्या पतीला कधीही घटस्फोट दिला नाही. तथापि, आजकाल, मी दर महिन्याला जोडप्यांना घटस्फोटाची कागदपत्रे पाठवल्याबद्दल ऐकतेय. असे का होत आहे गुरुदेव?”. “मी माझी बरीच वर्षे फिल्म इंडस्ट्रीमध्ये घालवली आहेत आणि अनेक लोकांना पाहिले आहे, परंतु याआधी त्यांनी कधीही एवढी कठोर पावले उचलली नाहीत जी सध्याची पिढी करत आहे. मला वाटतं त्यांच्यामधलं प्रेम लवकरच नाहीसं होत आहे आणि त्यांना एकमेकांचा लवकर कंटाळाही येतो. कदाचित हे सर्वात मोठे कारण आहे”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “सूरजच्या सहानुभूतीवर पुढे गेलीस”, निक्कीने अंकिताला टोकलं, म्हणाली, “घाण गेम खेळत…”

रविशंकर म्हणाले की, “आजकाल आकर्षण हे प्रेमापेक्षा जास्त असते. तरुण जोडप्यांमध्ये सहनशीलतेची पातळी नसल्यामुळे त्यांच्यातील समस्या सुटत नाहीत”, असा युक्तिवादही त्यांनी केला. ते म्हणाले, “तू गात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा. तुमची देवावर श्रद्धा होती. त्रास सहन करण्याची आणि त्यांना सामोरे जाण्याची ताकदही तुमच्यात होती”. उल्लेखनीय आहे की, आशा भोसले त्यांची बहीण लता मंगेशकर यांचे सचिव ३१ वर्षीय गणपतराव भोसले यांच्याबरोबर 16 वर्षांच्या असताना पळून गेल्या होत्या. त्यांनी कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केले आणि त्यांना तीन मुले झाली. मात्र, १९६० मध्ये हे जोडपे वेगळे झाले. त्यानंतर आशाने १९८० मध्ये आरडी बर्मन यांच्याशी लग्न केले आणि १९९४ मध्ये त्यांचे निधन झाले.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “चांगलीच कानाखाली मारलीस”, जय दुधाणेचा आर्याबरोबर व्हिडीओ, म्हणाला, “महाराष्ट्राची वाघीण…”

आशा भोसले यांनी ‘रंगीला’ची गाणी गात सिनेविश्वात पुनरागमन केले. वयाच्या ७९ व्या वर्षी तिने २०१३ मध्ये माई या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. गायनाबरोबरच या दिग्गज गायिकेला स्वयंपाकाचीही आवड आहे. तिने तिच्या छंदाचे करिअरमध्ये रुपांतरही केले आहे आणि ती जगभरातील मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट चालवते.

Tags: asha bhosale lifeasha bhosale on divorceAsha Bhosle Worried About Divorce
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Laxmichya Paulanni serial fame marathi actor Dhruva Datar called Navra Maza Navsacha 2 is bad movie.

"चित्रपट खूप वाईट", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं ‘नवरा माझा नवसाचा २’बाबत भाष्य, म्हणाला, "उगाच कौतुक का करु?"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.