Asha Bhosale On What Zumka Song: ‘रॉकी और राणी की प्रेमकहाणी’ हा चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. चित्रपटाची, चित्रपटातील कलाकारांची जितकी चलती आहे तितकीच चित्रपटातील गाणी देखील चर्चेत आहेत.सोशल मीडियावर सध्या ‘व्हॉट झुमका’ हे गाणं ट्रेंडिंगवर आहे. सध्या जुन्या गाण्यांचा रिमेक करण्याचा ट्रेंड सिनेसृष्टीमध्ये पाहायला मिळतो आहे. बॉलीवूड मध्ये हा ट्रेंड जोर धरू लागला आहे. ‘टीप टीप बरसा’, ‘एक दोन तीन’ या गाण्यांसोबत आता ‘झुमका गिरा रे’ गाण्याचा रिमेक ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ मध्ये पाहायला मिळाला.(Asha Bhosale On What Zumka Song)
कोणत्या ही क्षेत्रात दिग्ज मंडळी त्यांच्या,त्यांच्या क्षेत्रात होणाऱ्या नवीन कामाबद्दल भाष्य करत असतात.अनेकदा हक्काने कौतुकाची थाप दिली जाते किंवा काही गोष्टी खटकल्या तर नाराजी देखील व्यक्त केली जाते. मूळ गाणं ‘झुमका गिरा रे’ हे गाणं सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी गायलं आहे. परंतु, ‘व्हॉट झुमका’ या गाण्याबद्दल आशा भोसले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पाहा काय म्हणाल्या आशा भोसले? (Asha Bhosale On What Zumka Song)
इंडिया टुडे ला दिलेल्या मुलाखतीत आशा भोसलेंनी याबद्दल भाष्य केले आहे.याबाबत बोलताना आशा भोसले म्हणाल्या,”काळ खूप वेगवान आहे, आणि या पुढे देखील बदलत राहील.तुम्ही हे बदलू शकत नाही.संगीतकार नवीन गाणी बनवण्यासाठी सक्षम नाहीत. म्हणून ते जुन्या गाण्यांचा रिमेक बनवत आहे.’झुमका गिरा रे’ हे गाणं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात दिसलं.पंरतु हे खूप जुनं गाणं आहे.

हे देखील वाचा: ‘OMG २’नंतर अक्षय कुमारच्या आणखी एका बड्या चित्रपटाची घोषणा, प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का?
‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ हे गाणं अरजित सिंह,प्रीतम चक्रवर्ती, जोनीता गांधी यांनी गायलं आहे.या चित्रपटात रणवीर व आलिया सोबत जया बच्चन,धर्मेंद्र शबाना आझमी यांच्या सोबतच मराठी अभिनेत्री क्षिती जोग देखील मुख्य भूमिकेत आहे.