Aruna irani breast cancer : बॉलिवूड अभिनेत्री अरुना इराणी ८० वर्षांच्या वयाच्या जवळ असूनही आजही अगदी तंदुरुस्त दिसत आहेत आणि आजही त्या कार्यरत आहे. ५०० हून अधिक चित्रपट आणि अनेक टीव्ही शोमधून अरुण इराणी यांनी रसिकांच्या मनात घर केलं. नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करुन असणाऱ्या या अभिनेत्रीने अलीकडेच तिला स्तनाचा कर्करोग असल्याचे उघड केले आहे आणि एकदाच नव्हे तर दोनदा असे घडले असल्याचा खुलासा केला आहे. ‘बॉम्बे टू गोवा’, ‘कारवां’ आणि बर्याच चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अरुना इराणी म्हणाल्या की, वयाच्या ६०व्या वर्षी तिला मधुमेह झाला असल्याचं कळलं आणि तिच्या दोन्ही किडनी काम करत नसल्याचंही समोर आलं.
कर्करोगाशी झुंज देण्याविषयी बोलताना अरुणा इराणीने ‘लहरें’ यांच्या संभाषणात सांगितले, “मी एक दिवस शूटिंग करत होते, मला कसे कळले हे मला माहित नाही पण मला कसेतरी होत आहे हे तेव्हाच कळले. आणि त्यांनतर त्यांना स्तनाचा कर्करोग आहे हे समजले. मग त्यांनी एका डॉक्टरचा सल्ला घेतला, ज्याने सुरुवातीला त्यास एक लहान गाठ म्हणत दुर्लक्षित केलं. परंतु कर्करोग असल्याचे समजताच त्यांना कोणताही धोका घ्यायचा नव्हता, म्हणून त्यांनी त्वरित ते काढून टाकण्याचा आग्रह धरला.
त्यानंतर डॉक्टरांनी तिला केमोथेरपी सुचविली, परंतु केस गमावण्याची आणि त्वचेची पोत बदलण्याची भीती वाटत असल्याने ही थेरपी न घेण्याचा निर्णय अभिनेत्रीने घेतला. अरुना म्हणाली, “मग डॉक्टर म्हणाले की तुम्हाला एक गोळी घ्यावी लागेल आणि मी काम करत असल्यामुळे मी तेच निवडले. जर माझे केस गळून गेले तर मी कसे शूट करु? त्यावेळी मी बरी झाले पण मार्च २०२० मध्ये कोविडच्या अगदी आधी पुन्हा कर्करोग झाल्याचे कळले.
अभिनेत्री म्हणाली, “ही माझी चूक होती कारण पूर्वी मी केमोथेरपी घेतली नव्हती. यावेळी मी ती घेतली. आपले केस गळून जातात परंतु ते लवकरच परतही येतात”. दोनदा कर्करोग होऊन तो बरा झल्यानंतर आता अभिनेत्री वयाच्या ८० व्या वर्षी फिट आहे आणि तितक्याच ऊर्जेने काम करत आहे.





