सध्या अधिकमास सुरु आहे. दर तीन वर्षांनी येणार हा महिना पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जातो. या महिन्यात लेक व जावयाला आपल्या घरी बोलवले जाते, त्यांना गोड-धोड जेवण खाऊ घालतात, त्यांचा मानपान करतात व त्यांना भेटवस्तू देतात. म्हणून अधिकमास या महिन्याला लेक आणि जावयाचा खास कौतुकाचा महिना ओळखला जातो. (arun kadam adhik maas)
देश-विदेशातील तमाम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला कार्यक्रम म्हणजे छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. अनेक वर्ष प्रेक्षकांना मनमुराद हसवणाऱ्या या कार्यक्रमाचे जगभरात मोठी फॅन फॉलोईंग असून या कार्यक्रमाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तुफानी विनोदी स्किट्स, कलाकारांचे निरनिराळ्या शैली व यांसारख्या अनेक गोष्टींमुळे हा कार्यक्रम सातासमुद्रापार गेला आहे. असाच एक कलाकार, त्यांच्या अफलातून शैलीने लोकांच्या सदैव लक्षात राहतात. ते म्हणजे अभिनेते अरुण कदम. (arun kadam)

अभिनेते अरुण कदम यांनी हास्यजत्रेच्या मंचावर अनेक पात्र साकारले असून त्यांची प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी असतात. ते जेव्हा मंचावर एन्ट्री करतात, तेव्हा प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट ऐकू येतो. हास्यजत्रेबरोबर अरुण कदम मालिका, सिनेमांमध्येही अनेकदा दिसतात. शिवाय ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहतात. असाच एक व्हिडिओ अरुण कदम यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला असून चाहते त्यांच्या व्हिडिओला भरभरून प्रेम देत आहे.
पहा अरुण कदम यांचा ‘अधिकमास स्पेशल’ व्हिडिओ (arun kadam adhik maas video)
अधिकमासाच्या निमित्ताने अभिनेते अरुण कदम व त्यांच्या पत्नीने लेक सुकन्या आणि जावई सागर यांचा मानपान करतानाच एक खास व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून त्यांनी या व्हिडीओला ‘अधिक मास स्पेशल’ असं कॅप्शन दिलेलं आहे. व्हिडिओत अरुण कदम सहकुटुंब एका हॉटेलमध्ये गेले असून तिथे त्यांची पत्नी वैशाली ह्या लेक व जावयाचे औक्षण करताना दिसत आहे. तसेच त्यांनी जावयाचा मानपान करत त्याला व लेकीला चांदीची भेटवस्तू दिली. यानंतर कुटुंबातील इतर व्यक्तींनाही विविध भेटवस्तू भेट म्हणून दिल्या.
अभिनेते अरुण कदम यांचं त्यांच्या लेकीसोबतच बॉण्डिंग उत्तम असून बापलेकीची ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच त्यांची लेक सुकन्याचे डोहाळेजेवण पार पडले होते. अरुण कदम लवकरच आजोबा बनणार असून ते आपल्या नातवंडांची आतुरतेने वाट पाहत आहे. (arun kadam adhik maas video)
हे देखील वाचा : अवधूत गुप्तेंच्या घरात माकडाने घातला धुमाकूळ, व्हिडिओ होतोय वायरल