शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘एप्रिल मे ९९’ चित्रपटात झळकणार ‘हे’ चेहरे, बालपणीच्या आठवणींना मिळणार उजाळा, प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 27, 2025 | 12:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
April May 99 Movie Starcast

‘एप्रिल मे ९९’ चित्रपटात झळकणार ‘हे’ चेहरे, बालपणीच्या आठवणींना मिळणार उजाळा, प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता

April May 99 Movie Starcast : बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आता नवाकोरा मराठमोळा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर, प्रोमो तुफान व्हायरल होताना दिसले. आणि हा चित्रपट बालपणीच्या आठवणीत नेणारा वाटला तेव्हापासून साऱ्यांमध्ये चित्रपटासाठी उत्सुकता निर्माण झाली. रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. टीझर पाहून या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार, याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली असतानाच चित्रपटातील तीन कलाकारांचे चेहरे समोर आले आहेत. आणि यावरुन हेदेखील समोर आले की चित्रपटात तीन मित्रांच्या मैत्रीची गोष्ट अनुभवायला मिळणार आहे.

कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेशच्या मैत्रीची ही गोष्ट आहे. मात्र यात आणखी एक प्रमुख चेहरा आहे जो अद्यापही पडद्याआड आहे. त्यामुळे याबद्दलची उत्सुकता अजूनही ताणलेलीच आहे. दरम्यान यात चित्रपटात आर्यन मेंगजी (कृष्णा), श्रेयस थोरात (प्रसाद) आणि मंथन काणेकर (सिद्धेश) यांच्या भूमिका आहेत. आर्यन मेंगजी, श्रेयस थोरात व मंथन काणेकर या तिघांनी याआधीही काही चित्रपटांत, मालिकांमध्ये काम केले आहे. आर्यन मेंगजी याने ‘मोनिका ओ माय डार्लिंग’, बरोट हाऊस’, ‘डायबुक’, ‘बाबा’, ‘१५ ऑगस्ट’, ‘बालभारती’ अशा अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. आर्यनला महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘बालभारती’ चित्रपटासाठी उत्कृष्ट बालकलाकार म्हणून पुरस्कारही मिळाला आहे.

आणखी वाचा – ‘इट्स मज्जा’च्या ‘आठवी-अ’ वेबसीरिजला मानाचा पुरस्कार, प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती, कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव

श्रेयस थोरात याने कलर्स मराठीवरील ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेत मोरूची भूमिका साकारली असून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवले आहे. तर मंथन काणेकर याने ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘योगयोगेश्वर जय शंकर’, आणि ‘गाथा नवनाथांची’ या लोकप्रिय मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने ओळख निर्माण केली आहे. आता हे कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश उन्हाळ्याची सुट्टी आणखी दिमाखदार करायला ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटातून भेटीस येणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, “‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटातील भूमिका साकारण्यासाठी योग्य कलाकार निवडणं आमच्यासाठी आव्हानात्मक होतं. अनेक मुलांच्या ऑडिशन्स घेतल्यानंतर आम्ही आर्यन, श्रेयस आणि मंथन यांची या चित्रपटासाठी निवड केली. आर्यनची माधुरी दीक्षित यांच्या ‘१५ ऑगस्ट’ चित्रपटासाठी मीच निवड केली होती. तर रोहित शेट्टी यांची निर्मिती असणाऱ्या ‘स्कूल कॅालेज आणि लाईफ’ या चित्रपटासाठी श्रेयसची निवड केली होती. त्यामुळे हे दोघे माझ्या परिचयाचे होते. असे असले तरीही आमच्या टीमने ॲाडिशन घेऊन ते या भूमिकेत चपखल बसतात का, याचा विचार करुनच त्यांची निवड केली. सिद्धेशच्या भूमिकेसाठीही आम्ही बरेच पर्याय बघितले होते. परंतु त्याचे आणि त्याच्या वडिलांचे कास्टिंग मॅच करण्यासाठी आम्ही मंथनची निवड केली. हे तिघेही या भूमिकांसाठी अगदी योग्य आहेत. श्रेयस आणि मंथनचा प्रमुख भूमिका असणारा हा पहिलाच चित्रपट आहे. या तिघांच्याही अभिनयाने चित्रपटात अधिकच रंगत आणली आहे. मला खात्री आहे प्रेक्षकांना देखील या तिघांचा अभिनय नक्कीच आवडेल”.

आणखी वाचा – Video : कार्तिकी गायकवाडच्या भावाच्या केळवणाचा न्याराच थाट, सासरी बोलावून जंगी स्वागत, फुलांच्या पायघड्या अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

निर्माते राजेश मापुस्कर चित्रपटाबद्दल म्हणाले, “रोहन मापुस्कर हे इंडस्ट्रीतील कास्टिंग डिरेक्टर म्हणून ओळखलं जाणारं नाव आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटात कोण झळकणार याची उत्सुकता मलाही खूप होती. ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट मैत्री, तारुण्याच्या आठवणींना उजाळा देणारा असल्याने चित्रपटातील कलाकारांची योग्य निवड होणे, हे अत्यंत गरजेचं होतं आणि त्यानुसार ही निवड झाली आहे. मुलांची निवड झाल्यानंतर त्यांचे तीन महिन्यांचे वर्कशॉप घेण्यात आले. आता लवकरच प्रेक्षकांना त्यांची केमिस्ट्री पडद्यावर पाहायला मिळेल. हा एक कौटुंबिक चित्रपट असून तो सर्वांनी एकत्र पाहावा असा आहे”.

मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत. येत्या मे महिन्याच्या सुट्टीत म्हणजेच १६ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Tags: April May 99 MovieApril May 99 Movie Starcastmarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
Sonalika Joshi Lovestory

भाड्याचं घर, शुन्यातून सगळं उभारलं अन्…; सोनालिका जोशीने सांगितली तिची खरी लव्हस्टोरी, नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे फुलला संसार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.