”झी मराठी’ वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत आलेल्या सात वर्षाच्या लीपनंतर या मालिकेने एक वेगळंच वळण घेतलेलं पाहायला मिळत आहे. मालिकेत एकामागोमाग येणारी रंजक वळणं मालिकेला एका उंचीवर घेऊन गेली आहेत आणि अप्पी व अर्जुन यांच्यातील दुरावा केव्हा मिटणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळून राहिल्या आहेत. तर अमोल व अर्जुनच्या भेटीकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. अखेर मालिकेच्या समोर आलेल्या भागात असं पाहायला मिळतं आहे की, अमोलला काही गुंडांनी किडनॅप केलेलं असतं. (Appi Amchi collector Promo)
या वेळेला अप्पी व अर्जुन एकत्र येत त्यांचा शोध घेत असतात मात्र त्या दरम्यानही त्यांच्यात वाद होतात आणि दोघेही आपापल्या मार्गाने अमोलला शोधू लागतात. मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये अखेर अमोलला अर्जुन भेटलेला असतो. दोघंही सात वर्षांनी एकमेकांना भेटतात तेव्हा अगदी कडकडून मिठी मारतात आणि ढसाढसा रडू लागतात. अशातच मालिकेच्या एका प्रोमोने लक्ष वेधले आहे. अमोल भेटण्याआधी अर्जुन व अप्पी एकमेकांना भेटतात तेव्हा अमोल भेटत नसल्याने अप्पीला रडू कोसळतं आणि त्यानंतर अर्जुन अप्पीला मिठीत घेऊन ढसाढसा रडू लागतो.
आणखी वाचा – पारूचं मन आदित्यमध्ये गुंततंय, एकमेकांसह फिरायलाही गेले, अखेर देणार का प्रेमाची कबुली?
दोघांनाही असे एकत्र पाहून अप्पीच्या भावाला आणि वडिलांना खूप आनंद होतो मात्र अमोल भेटत नसल्याने त्यांना दुःख होत असतं. अमोलसाठी तरी या दोघांनी एकत्र यावे अशी मनोमणी ते इच्छा व्यक्त करतात. सात वर्षांपूर्वी यांच्यात असणार न तुटणार असं प्रेम पुन्हा फुलणार का?, अर्जुन अमोलसाठी तरी एकत्र येणार का?, याकडे आता साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
अर्जुनने आता त्याची पोलीस सह कर्मचारी आर्यासह साखरपुडाही केलेला असतो आता अर्जुन हा साखरपुडा अप्पी व अमोलसाठी मोडणार का?, आर्याला तो या सगळ्याचं काय उत्तर देणार?, हे सारं पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.