‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येत आहेत. अचानक मालिकेने सात वर्षांचा लीप घेतला त्यामुळे मालिकेच्या बदलत्या कथानाकाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेत सात वर्षांचा लीप आल्याने मालिका एका वेगळ्याच कथानकावर आली आहे. त्यामुळे या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सात वर्षांच्या लीपनंतर अप्पी, अर्जुन आणि अमोलचा बदलता प्रवास पाहायला मिळत आहे. (Appi Amchi Collector Promo)
मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, सात वर्षांनी अर्जुन व अप्पी यांची भेट होते. मात्र अर्जुन अप्पीला दोष देतो. अमोलला दूर केल्याचा दोषही तो अप्पीला देतो. मात्र अप्पी अर्जुनला दिलेलं वचन पाळत असते. अद्याप अर्जुनला ही अमोल हा त्याचा मुलगा असल्याचं सत्य समजलेले नसते. मात्र अर्जुनच्या समर कॅम्पमध्ये अमोल सिंबा या नावाने एंट्री घेतो. त्यामुळे अर्जुनला अमोलच त्याचा मुलगा असल्याचं समजत नाही. अमोलच्या वाढदिवसाला अर्जुनने भेटवस्तू द्यावी म्हणून अप्पी अर्जुनच्या घरी त्याला भेटायला जाते.
अप्पी कदमांच्या घरी जाते तेव्हा अर्जुनची वहिनी तिचा अपमान करते आणि तिला परतून लावते. अर्जुनच्या वहिनीला अप्पीचा राग असतो. त्यामुळे ती अप्पीच्या भावाच्या बायकोला हाताशी धरून कटकारस्थान करते. जेणेकरुन अर्जुनच्या आयुष्यात अप्पी येणार नाही. त्यामुळे ती मोनाकडे घटस्फोटाचे कागद पाठवते. मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये याची झलक पाहायला मिळत आहे.
मालिकेच्या या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अप्पीला मोना घटस्फोटाचे पेपर्स देते. ते पाहून अप्पीच्या पायाखालची जमीन सरकते. अप्पीला खूप मोठा धक्का बसतो. मोना ते पेपर्स देऊन म्हणते की, हे काय आहे?, यावर अप्पी म्हणते, डिवोर्स पेपर्स. यावर खोटं नाटक करत मोना म्हणते, “आता काय करायचं”. यावर अप्पी बघू असं म्हणते. त्यावर मोना अर्जुनच्या वहिनीला फोन करून खोटं सांगते की, त्यांना डिवोर्स पेपर्स पाहून खूप आनंद झाला. यावर अर्जुनची वहिनी म्हणते, “अप्पीने लवकरात लवकर त्या पेपर्सवर सह्या करून भावोजींना पाठवायला हवे”. आता कोणतीही पडताळणी न करता अप्पी त्या डिवोर्स पेपर्सवर सह्या करणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.