शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आजारपणामुळे अमोलचे गंभीर हाल, चालताही येईना अन्…; अवस्था बघून सर्वांनाच दु:ख अनावर

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 18, 2024 | 12:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Appi Aamchi collector serial updates Amol is unable to walk due to chemotherapy new promo viral on social media

केमोथेरपीमुळे अमोलचे गंभीर हाल, चालताही येईना अन्...; नवीन प्रोमो व्हायरल

टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका या प्रेक्षकांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग असतात. काही मालिका त्यांच्या वेगळ्या कथानकामुळे, कलाकारांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या बनलेल्या असतात. अशा मालिकांपैकी म्हणजे एक म्हणजे ‘अप्पी माझी कलेक्टर’ ही मालिका आहे.  अमोलच्या आजारपणामुळे ही मालिका सध्या नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. आजारामुळे सर्वजण त्याला आनंदी ठेवण्यासाठी त्याच्या प्रत्येक सगळ्या इच्छा आणि हट्ट पूर्ण करत आहेत. त्यामुळे ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही आता नव्या टप्प्यावर आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेत अमोलच्या हट्टापायी अर्जुन व अप्पी यांनी लग्नाचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आनंदी वातावरण होते.

अशातच आता या आनंदी वातावरणात मीठाचा खडा पडला आहे. मालिकेच्या नुकत्याच आलेल्या नवीन प्रोमोने आगामी भागाची झलक दाखवण्यात आली आहे. मालिकेच्या आगामी भागात अमोलच्या आजापरणाचे आणखी गंभीर स्वरूप पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोमध्ये अमोल व्हीलचेअरवर बसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्याला अशा अवस्थेत बघू सगळेच काळजीत पडतात. सगळेजण अर्जुनला अमोलला हे काय झालं आहे असं विचारतात. त्यानंतर अर्जुन अमोलविषयी सांगताना असं म्हणतो की, “अमोलच्या केमोथेरपीचा हा परिणाम आहे. केमोमुळे त्याला उभं राहता येत नाहीये”.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – हॉस्पिटलमधून परतल्यावर हिना खानची ‘अशी’ झाली आहे अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली, “माझ्या हृदयाचे…”

अर्जुनचे हे उत्तर ऐकून सर्वांनाच धक्का बसतो आणि अमोलची ही अवस्था बघून सगळे दुखावतात.  मालिकेचा हा नवीन प्रोमो व मालिकेच्या कथानकात आलेला हा ट्विस्ट सर्वांनाच धक्कादायक आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय पाहायला मिळणार? अमोल यातून बाहेर पडणार का? या सगळ्यात त्याला अप्पी-अर्जुनची साथ कशी लाभणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

आणखी वाचा – ‘जवान’ फेम दिग्दर्शकाची कपिल शर्माने रंग-रुपावरुन उडवली होती खिल्ली, ट्रोल झाल्यानंतर आता दिली प्रतिक्रिया, म्हणाला, “उगाच…”
 

दरम्यान, अमोल या आजाराशी धाडसाने लढत आहे. त्याला बरे करण्यासाठी अप्पी-अर्जुन आणि त्यांचे कुटुंब प्रयत्न करताना दिसत आहे. त्याच्या आजारपणामुळे घरातील सर्व जण चिंतेत असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच केमोथेरपीमुळे त्याचे केस गळत असल्याचा सीन दाखवण्यात आला होता. या सीनमध्ये अर्जुन व अप्पी त्याचे केस कापण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर आता त्याला चालता येत नसल्याचे पाहून पुन्हा सर्व जण चिंतेत पडले आहेत.  

Tags: amchi collectorAppi Aamchi Collector Serial Updatesappi amchi collector marathi tv serial
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Allu Arjun's Pushpa 2 premiere stampede incident injured boy is still on ventilator and is in critical condition

‘पुष्पा २' चेंगराचेंगरी प्रकरणातील जखमी मुलगा अजूनही व्हेंटिलेटवर, प्रकृती चिंताजनक, मेंदूला गंभीर इजा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.