शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्यापेक्षा मालिकाच बंद करा”, ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेवर प्रेक्षक नाराज, कथेतील ट्विस्ट पाहून म्हणाले, “दाखवण्यासारखं काहीच नसेल तर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 14, 2024 | 5:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
"त्यापेक्षा मालिकाच बंद करा", 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेवर प्रेक्षक नाराज, कथेतील ट्विस्ट पाहून म्हणाले, "दाखवण्यासारखं काहीच नसेल तर..."

"त्यापेक्षा मालिकाच बंद करा", 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेवर प्रेक्षक नाराज, कथेतील ट्विस्ट पाहून म्हणाले, "दाखवण्यासारखं काहीच नसेल तर..."

छोट्या पडद्यावरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका गेले काही दिवस प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. कारण अप्पी व अर्जुन दोघेही आता वेगवेगळ्या वाटेवर प्रवास करणार आहेत. मालिकेतील ही लीप प्रेक्षकांना आवडत असून मालिकेच्या या नवीन वळणाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असलेला पाहायला मिळत आहे. गेले काही दिवस अप्पी व अर्जुन यांची भेट होत नव्हती. पण अखेर आता अप्पी व अर्जुन एकमेकांसमोर आले असून त्यांची भेट झाली आहे. या भेटीत अमोलविषयी त्यांच्यात बोलणं झालं असून अर्जुनला सिंबा हा त्यांचाच मुलगा असल्याचे अजून समजलेले नाही.

मालिकेत आतापर्यंत झालेल्या भागामध्ये गायतोंडे अपर्णाला सांगतात की, “तुम्ही दोघं शिकलेले आहात. सुशिक्षित आहात तुम्ही दोघांनी एकत्र यायला पाहिजे आणि तुमचा आतापर्यंतचा प्रवास मी पाहिला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, तुम्ही दोघांनी एकत्र एकमेकांशी बोलायला हवं”. अशातच मालिकेच्या एका नवीन प्रोमोमध्ये अर्जुन अप्पीला भेटायला जातो. पण तो तिच्याविषयी काहीतरी गैरसमज करुन घेतो. या नवीन प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट्सद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – “अती झालं”, ‘सातव्या मुलीची…’मध्ये रुपालीच्या डोळ्यांमध्ये नेत्राने मसाला फेकलेला प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, “राग येतो कारण…”

या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी एकाने “बंद करून टाका ही मालिका” असं म्हटलं आहे, तर आणखी एकाने  “दाखवण्यासारखं काही नसेल तर बंद करा मालिका. एवढ्या मोठ्या हुद्दावर असणारे अधिकारी बिनडोकसारखं वागत नाहीत” अशी कमेंट केली आहे. तसेच आणखी एकाने “एक पोलिस आणि एक कलेक्टर दाखवली आहे, एवढं शिक्षण पण विचार तेच जुनाट आणि रटाळ. बंद करा ही मालिका, उगाच काहीही दाखवू नका” अशी कमेंट केली आहे.

आणखी वाचा – ‘बाहुबली’ ते ‘बस्तर’, येत्या आठडवड्यात ओटीटी प्रेक्षकांसाठी थ्रिलर व अ‍ॅनिमेटेड चित्रपटांची असणार मेजवानी, वाचा संपूर्ण यादी

दरम्यान, काहींनी या प्रोमोखाली मालिकेतील अर्जुन या पात्राबद्दल नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. सात वर्षांच्या लीपमुळे व अमोलच्या एंट्रीने या मालिकेला एक नवीन वळण आलं होतं. त्यामुळे मालिका प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत होती. मात्र मालिकेचा हा नवीन प्रोमो चाहत्यांना आवडला नसून त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

Tags: appi aamchi collectormarathi entertainment newsMarathi Serial News
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Marathi actress Aditi Dravid shared some glimpses of her new home Pooja.

Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा नव्या घरात गृहप्रवेश, गोवऱ्यांची चूल पेटवत जपली परंपरा, व्हिडीओमध्ये दिसली घराची झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.