शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Appi Amchi Collector मालिकेत नवा ट्विस्ट, अमोलने अप्पी-अर्जुनला सांगितलं आजार लपवण्यामागचे कारण, पुढे काय होणार?

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 14, 2024 | 11:46 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Appi Aamchi Collector Marathi serial update Amol Reveals the Reason behind Hiding His Illness

Appi Aamchi Collector मालिकेत अमोलने त्याचा आजार लपवण्यामागचे नेमके कारण सांगितले

‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक नवनवीन वळण येत आहेत. मालिकेत अप्पी व अर्जुन यांना एकत्र आणण्यासाठी अमोल प्रयत्न करत होता आणि त्याच्या या प्रयत्नांना यश आले असून नुकतंच मालिकेत अप्पी व अर्जुन अमोलसाठी एकत्र आले. अर्जुनने अप्पी आणि अमोलबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. अप्पी-अर्जुन दोघे अमोलसाठी एकत्र आले आहेत. त्यांना एकत्र आल्याचे पाहून प्रेक्षकही आनंदी झाल्याचे पाहायला मिळाले. मालिकेत सगळं काही ठीकचाललं असतानाच मीठाचा खडा पडला तो म्हणजे अमोलच्या आजारपणाचा. (Appi Aamchi Collector Serial Updates)

अमोलच्या प्रयत्नानंमुळे अर्जुन-अप्पी एकत्र आले आहेत. पण त्यांना एकत्र आणणारा अमोल आजारी पडला आहे. मालिकेत काही दिवसांपूर्वी त्याला आजार झाल्याचे समोर आले होते. मात्र हा आजार नक्की काय होता? याविषयी कुणालाच काहीच कल्पना नव्हती. अमोलने त्याच्या आजारपणाचे कारण सर्वांपासून लपवलं होतं. अमोलच्या मन:शांतीसाठी अमोलला झालेल्या आजाराचं सत्य लपवण्याचा निर्णय स्वप्नील आणि रुपालीने घेतला. दिवाळीच्या तयारीत सगळे असतानाच दीप्या अमोलच्या आजाराचं सत्य सर्वांसमोर मांडतो. हे ऐकून सगळे हादरतात.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – प्रसाद खांडेकरच्या लेकाचं अनोखं टॅलेंट, बालदिनानिमित्त अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ, म्हणाला, “काहीही बोलणाऱ्यांना…”

रुपाली आणि तिच्या कुटुंबाला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतात. अमोल त्यांना समर्थन देत सांगतो की, हे सत्य लपवण्यामागे त्यांचा हेतू चांगला होता. अप्पा आणि बापूदेखील यावेळी अप्पी व अर्जुन यांना खडेबोल सुनावतात. तुमच्यातीळ हेकेखोरपणामुळे आणि तणावामुळे तुम्ही अमोलकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचाच परिणाम आता अमोलला भोगावे लागत असल्याचे त्यांनी सुनावलं.

आणखी वाचा – “जैसे ज्याचे कर्म तैसे…”, सूरज चव्हाणच्या प्रत्येक बाबतीतून अंकिता वालावलकरचा काढता पाय, म्हणाली, “या दलदलीत…”

त्यामुळे आता या सर्वांवर अप्पी व अर्जुन काय निर्णय घेणार? हे लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, आता या सर्वाचा अप्पी व अर्जुन यांच्या नात्यावर काय परिणाम होणार? अप्पी व अर्जुन दोघे अमोलमुळे पुन्हा एकत्र येणार का? अमोलच्या आजारामुळे घाबरलेले अप्पी आणि अर्जुन आता सावरणार का? हे आगामी भागातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.  

Tags: Appi Aamchi Collector Marathi SerialAppi Aamchi Collector Serial UpdatesMarathi Serial News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Next Post
Tharla Tar Mag Serial Update

Tharla Tar Mag Serial : अर्जुनने सायलीची इच्छा केली पूर्ण, जेलमधून मधुभाऊंची सुटका करत दिलं खास सरप्राइज, मालिकेत नवं वळण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.