BBM 6 Fame Anushree Mane Lovestory : ‘बिग बॉस मराठी सिझन ६ चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान या घरातील सदस्यांनी सुद्धा हळूहळू आपले रंग दाखवत आपला वेगळा फॅन बेस तयार केलाय. तर काहींचा वागणं प्रेक्षकांना फारच खटकत आहे. तर सध्या अनुश्री माने आणि राकेश बापट यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आहे. अनुश्री माने हिने राकेश बापटवर विचित्र आरोप केले. मी झोपेत असताना राकेशने मला हाताला खेचत उठवलं. तो माझ्या परवानगीशिवाय माझ्या शरीराला हात लावू शकत नाही. त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला असे आरोप तिने केले. आणि यांच्यातील हा वाद चांगलाच पेटला. याचबरोबर अनुश्री सध्या तिच्या पर्सनल आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत आहे. अनुश्रीचा बॉयफ्रेंड कोण होता याबद्दल देखील प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता होती.
दरम्यान अनुश्री माने ही तिच्या मावस बहिणीच्या दिरासोबत रिलेशनशिप मध्ये होती. अर्जुन मोरे असं त्याचं नाव असून तो अनुश्री पेक्षा 8 वर्षांनी मोठा होता. दोघेही रिलेशनशिपमध्ये असताना अनुश्री 19 वर्षांची तर अर्जुन 27 वर्षांचा होता. पण 2024 मध्ये या दोघांचे ब्रेकअप झालं. दोघांनी एकत्र अनेक व्हिडीओ आणि रोमँटिक रील्स शेअर केल्या होत्या. इतकंच नाही तर अनुश्रीने स्वतःच्या युट्यूब चॅनेलवरून बॉयफ्रेंडची ओळख करून देणारा व्हिडीओ देखील शेअर केला होता. त्या काळात दोघं लग्न करणार असल्याचंही बोललं जात होतं.अनुश्रीने तिच्या सोशल मीडियावर त्याच्यासोबतचे फोटोही शेअर केले होते. मात्र आता तिच्या फॅन पेजवर हे फोटो पुन्हा व्हायरल होत आहेत. (BBM 6 Fame Anushree Mane Lovestory)
अनुश्री माने ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून तिचे इंस्टाग्रामवर १.६ मिलियन फॉलोवर्स आहेत. बऱ्याच गाण्यांमध्ये सुद्धा तिने परफॉर्मन्स केला आहे. बिग बॉसच्या घरात सहभागी होण्यापूर्वी तिचे स्पर्धक आयुष्य सोबतचे गाणे प्रदर्शित झाले होते. (BBM 6 Fame Anushree Mane Lovestory)




