बुधवार, मे 21, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“काही परिणाम होत नाही…”, सावत्र मुलीबरोबरच्या वादावर रुपाली गांगुलीने सोडलं मौन, म्हणाली, ‘वाईट वेळ…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 10, 2024 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rupali Ganguly Break Silence

सावत्र मुलीबरोबरच्या वादावर रुपाली गांगुलीने सोडलं मौन,

Rupali Ganguly Break Silence : सध्या टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या सावत्र मुलीने तिच्यावर अनेक आरोप केले होते. यानंतर अभिनेत्रीनेही अनेक पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली. आता रुपाली गांगुलीने या वादावर मौन सोडले आहे. रुपालीची सावत्र मुलगी ईशा वर्मा हिने तिला विषारी व अपमानास्पद म्हटले होते. ईशा ही अश्विन आणि त्याची पहिली पत्नी सपना यांची मुलगी आहे. २००८ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अश्विनने २०१३ मध्ये रुपालीशी लग्न केले. ईशाची २०२० सालची पोस्ट व्हायरल झाल्यावर हा वाद सुरु झाला. ज्यामध्ये ईशाने रुपालीवर अनेक आरोप केले होते.

आईशी लग्न केल्यानंतर रुपालीच अश्विनबरोबर अफेअर असल्याचा आरोप ईशाने केला आहे. ईशाने रुपालीवर नियंत्रण व अपमानास्पद असल्याचा आरोप केला असून, अभिनेत्रीने तिला व तिची आई दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असंही म्हटलं. रुपालीने आता ‘इन्स्टंट बॉलिवूड’ला दिलेल्या मुलाखतीत या वादावर मौन सोडले आहे. तिला मुलाखतीत विचारण्यात आले की, “या सर्व गोष्टींचा तिच्यावर काही प्रभाव पडत आहे का?”. यावर रुपाली म्हणाली, “काही परिणाम होत नाही असं मी बोलले तर मलाच खोटं ठरवतील. अर्थात परिणाम होतो. आपण माणसं आहोत आणि आपल्या मागे कोणी आपल्याबद्दल थोडे वाईटही केले तर आपल्याला वाईट वाटते”.

आणखी वाचा – “लग्नाला नक्की या! हवा तेवढा जोरात कान पिळा”, अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याचं डीपीला आमंत्रण, म्हणाला, “कधीही विसरणार नाही आणि…”

रुपाली पुढे म्हणाली, “जे लोक प्रेम करतात ते प्रेम करत राहतात. चांगले काम करत राहा, आज नाही तर उद्या तुमच्याकडून चांगल्या गोष्टी नक्कीच घडतील. वाईट वेळ कधीतरी येते, वाईट गोष्टी घडतात, पण नेहमी चांगल्याचाच विजय होतो”. गेल्या महिन्यात रुपालीने ईशाच्या मानहानीचा खटला जिंकला होता. रुपालीने ईशावर ५० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला होता.

आणखी वाचा – “कोणाच्या बापाचा हिंदुस्थान नाही”, इंदौरमध्ये बजरंग दलाच्या निषेधादरम्यान दिलजीत दोसांझचा टोमणा, गझल गात दिलं उत्तर

रुपालीने दाखल केलेल्या खटल्यानंतर ईशा म्हणाली की, “गेल्या २४ वर्षांपासून मी अडकले होते. मला माझ्या बोलण्याने कोणाला दुखी करायचं नव्हतं. पण हे सगळं बोलणं मला गरजेचं होतं. पण एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की स्वतःच्या मुलाला खरं बोलण्याची इतकी मोठी शिक्षा मिळू नये. मी एक तरुण मुलगी आहे पण मी अजूनही माझ्या वडिलांची मुलगी आहे. त्यांनी मला खूप क्रूरपणे उत्तर दिलं आहे. हाच त्यांचा खरा चेहरा आहे”.

Tags: rupali ganguliRupali Ganguly Break Silencetelevision actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raja Shivaji Release Date Announced
Entertainment

मोठी घोषणा! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तारीख समोर, सहा भाषांत होणार प्रदर्शित

मे 21, 2025 | 6:27 pm
Vaishnavi Hagwane Death
Social

पैशांसाठी मारहाण, नणंद तोंडावर थुंकली अन्…; पुण्यातील घरंदाज कुटुंबातील सूनेची आत्महत्या, आई-वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मे 21, 2025 | 5:54 pm
Sunil Shetty on Pahalgam attack
Entertainment

पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड शांत का?, सुनील शेट्टी स्पष्टच बोलले, म्हणाले, “बोललं की शिवीगाळ होते आणि…”

मे 21, 2025 | 4:09 pm
Viral Video
Entertainment

Viral Video : भर रस्त्यात नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, बाळालाही फेकलं अन्…; पालक म्हणून हरले…

मे 21, 2025 | 2:50 pm
Next Post
South actor and Deputy Chief Minister of Andhra Pradesh Pawan Kalyan received death threats and insults through a phone call.

सलमान, शाहरुखनंतर आणखी एका दाक्षिणात्य अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी, सिनेविश्वात मोठी खळबळ, नेमकं प्रकरण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.