सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुकेश अंबानींच्या लेकाच्या लग्नपत्रिकेवर चांदीचं मंदिर, सोन्याचाही करण्यात आला वापर, व्हिडीओ दिसली संपूर्ण झलक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 27, 2024 | 1:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
anant ambani wedding invitation card

मुकेश अंबानींच्या लेकाच्या लग्नपत्रिकेवर चांदीचं मंदिर, सोन्याचाही करण्यात आला वापर, व्हिडीओ दिसली संपूर्ण झलक

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी लगीनघाई सुरु झालेली पाहायला मिळत आहे. या शाही विवाहसोहळ्याचे आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी १२ जुलै रोजी राधिका मर्चंटसह लग्नबंधनात अडकणार आहे. १२ जुलै रोजी ते मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सात फेरे घेणार असल्याचं समोर आलं आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये आधी प्री-वेडिंग पार्टी आणि नंतर क्रूझवर पार्टी झाल्यनानंतर आता संपूर्ण अंबानी कुटुंब लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. नीता अंबानी यांनी आपल्या मुलाच्या लग्नाची पहिली पत्रिका काशी येथे बाबा विश्वनाथ यांच्या चरणी अर्पण केली आहे. त्यानंतर अनंत आपल्या खास मित्रांना, पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी निघाला आहे. (anant ambani wedding invitation card)

अजय देवगणनंतर तो आता अक्षय कुमारच्या घरी पोहोचला असून त्याला चांदीची मंदिरासारखी लग्नपत्रिका दिली. सोशल मीडियावर लग्नपत्रिकेचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यांत शिव, गणेश व राम यांच्या मूर्ती आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा १२ जुलैला सुरु होऊन १४ तारखेला संपणार आहे. या सोहळ्यात देशातील दिग्गज व्यक्ती सहभागी होणार आहेत. अनंत स्वत: त्याच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी निघाला आहे. अजय देवगण, अक्षय कुमार यांच्या घरी जात अनंतने स्वतः पत्रिका दिलेली पाहायला मिळाली.

आणखी वाचा – अशोक सराफ व निवेदिता सराफांच्या लग्नाला ३५ वर्ष पूर्ण, असं झालं होतं लग्न, फोटोंमधील साधेपणाने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अनंत व राधिकाच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जी खूपच अनोखी आहे. त्यात अनेक हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती व फ्रेम आहेत. या पत्रिकेत छोटेसे चांदीचे मंदिरही पाहायला मिळत आहे. लग्न पत्रिकेची ही पेटी उघडताच बॅकग्राउंडमध्ये एक हिंदी मंत्रही वाजत आहे. पहिल्या दिवशी एक शुभ विवाह सोहळा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या खास दिवसासाठी भारतीय पारंपरिक ड्रेस कोडला प्राधान्य दिलं आहे. दुसऱ्या दिवशी १३ जुलै रोजी आशीर्वाद समारंभ होईल, ज्यामध्ये पाहुण्यांना भारतीय औपचारिक पोशाख परिधान करुन यावे लागेल. १४ जुलै रोजी लग्नसोहळा आणि मंगल उत्सव होणार आहे. या फंक्शनमध्ये भारतीय आकर्षक ड्रेस कोड आहे.

आणखी वाचा – ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वातील पहिला स्पर्धक घराबाहेर, सुप्रसिद्ध स्पर्धकाची आश्चर्यकारक एक्झिट

यापूर्वी एक ते तीन मार्च या कालावधीत गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत व राधिकाची प्री-वेडिंग पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये केवळ देशातीलच नाही तर परदेशी पाहुणेही उपस्थित होते. यावेळी ग्लोबल पॉप स्टार रिहानाने जबरदस्त परफॉर्मन्स दिला. यानंतर २९ मे ते १ जून या कालावधीत क्रूझ पार्टी झाली, जी इटलीमध्ये संपन्न झाली. या पार्टीलाही जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली होती. ही पार्टी ७५०० कोटी रुपयांच्या क्रूझवर झाल्याचे सांगण्यात आले.

Tags: Anant Ambani Radhika Merchantanant ambani weddinganant ambani wedding invitation cardentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Dr. Nilesh Sable shared a video of Bhau Kadam and Omkar Bhojane doing make-up in the show Hastay Na Hasaylacha Pahije

Video : निलेश साबळे सेटवर स्वतः करत आहे भाऊ कदम व ओंकार भोजनेचा मेकअप, नव्या शोसाठी मेहनत, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.