Anant Ambani-Radhika Merchant Marriage : देशातील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळाली. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी अखेर विवाहबंधनात अडकला आहे. बरेच दिदवसांपासून अनंत अंबानी याच्या लग्नाची धामधूम सुरु होती. अनंतने जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये त्याची प्रेयसी राधिका मर्चंटसह लग्न केले. या जोडप्याने सात फेरे घेतले असून ते आता सात जन्म एकमेकांचे झाले आहेत. लग्नानंतर अनंत-राधिकाचा एकत्र पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये नववधू-वर इतके छान दिसत आहेत की त्यांच्यापासून नजर हटवणे कठीण होऊन झाले आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे सर्व विधी शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री १२.३० च्या दरम्यान पूर्ण झाले. वधू-वरांच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर, अनंत अंबानी याने लग्नासाठी लाल रंगाच्या शेरवानीमध्ये परिधान केली होती, आणि या कपड्यांमध्ये तो खूपच छान दिसत होता. तर राधिका मर्चंट पांढऱ्या रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा काल जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वैदिक पद्धतीने मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला. अनंत संध्याकाळी ४ वाजता अँटिलियाहून निघत तो वरात घेऊन आला. संगीत वाद्यांसह, नवरा मुलगा लग्नाच्या ठिकाणी पोहोचला जिथे त्याने संपूर्ण कुटुंबासह पोझ दिली. नवऱ्या मुलाने त्याच्या कुटुंबासह एकदम ग्रँड एंट्री घेतलेली दिसली.
राधिका-अनंतच्या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटींनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण बॉलिवूडच अंबानीच्या आमंत्रणाचा मान राखत अवतरलं. जॅकी श्रॉफ, सलमान खान, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, अनन्या पांडे, सारा अली खान आणि खुशी कपूर यांसारख्या कलाकारांनी लग्नाला हजेरी लावली होती. संगीतकार ए आर रहमान, साऊथचा सुपरस्टार रजनीकांत, दिग्दर्शक एटली कुमार, कुटुंबासह धोनी, हार्दिक पांड्या या सेलिब्रिटींचीही लग्नाला हजेरी होती.