रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नीता अंबानींनी स्वतःच्या हातावरील मेहंदीवर लिहिली संपूर्ण कुटुंबियांची नावं, डिझाईनही होती फारच खास, चर्चा रंगली कारण…

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 13, 2024 | 5:28 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
nita ambani mehndi

नीता अंबानींनी स्वतःच्या हातावरील मेहंदीवर लिहिली संपूर्ण कुटुंबियांची नावं, डिझाईनही होती फारच खास, चर्चा रंगली कारण…

सध्या सगळीकडे अंबानी कुटुंबाची चर्चा सुरू आहे. अंबानी कुटुंबातील धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या शाही लग्नाची हवा आहे. १२ जुलै रोजी अनंत व राधिका हे मुंबई येथी जिओ कन्वेन्शन सेंटरमध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांच्या शाही विवाहसोहळ्यासाठी जगभरातील अनेकांनी हजेरी लावली होती. यावेळी आलेल्या पाहुण्यांना भारतीय संस्कृतीचे दर्शन झाले. लग्नाच्या काही दिवस आधी अनंत व राधिकाच्या लग्नाआधीच्या विधीना सुरुवात झाली होती. हळद व संगीत सोहळ्याचे अनेक व्हिडिओदेखील समोर आले होते. यावेळीही त्यांनी सर्व भारतीय परंपरा जपल्याचे दिसून आले. (nita ambani mehndi)

दरम्यान शाही विवाहसोहळा संपन्न होईपर्यंत अंबानी कुटुंबातील सर्व महिलांच्या पेहरावांची अधिक चर्चा रंगली होती. राधिकाचा संगीत लुक, हळदीचा लुक मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. त्याचप्रमाणे अंबानी कुटुंबाची राजकुमारी ईशा अंबानीच्या ड्रेसेसची देखील सगळ्यांनी स्तुति केली. त्याचप्रमाणे आकाश अंबानीची पत्नी श्लोका अंबानीदेखील चांगलीच चर्चेत राहिली. अशातच नवरदेवाची आई नीता अंबानी यांच्या पेहरावाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. त्यांनी आजवर प्रत्येक सोहळ्यामध्ये भारतीय प्रथा व परंपरा जपण्याचा प्रयत्न केला. याबरोबरच त्यांच्या मेहंदीची चर्चाही झाली.

आणखी वाचा -भुवनेश्वरीची नवीन खेळी, फॅक्टरीचा कारभार अधिपतीकडून पुन्हा स्वत:च्या हातात घेणार, अक्षरा देईल का सासूला धोबीपछाड?

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

नीता यांच्या मेहंदीमध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबाबद्दल प्रेम दिसून येत आहे. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्या आपल्या हातावरील मेहंदी दाखवत आहेत. तसेच या मेहंदीमध्ये काय खास आहे हेदेखील सांगताना दिसत आहेत. नीता यांनी मेहंदीमध्ये पती मुकेश अंबानी यांचे नाव लिहिले आहे. त्याचप्रमाणे मुलं, जावई, नातवंडांची नावंही लिहिलेली दिसत आहेत. नीता यांच्या एका हातावर राधा-कृष्णाची प्रतिमा असलेली मेहंदी आहे. तसेच उलट्या हातावर अनंत व राधिका यांचे नाव लिहिलेले आहे.

आणखी वाचा – भुवनेश्वरीची नवीन खेळी, फॅक्टरीचा कारभार अधिपतीकडून पुन्हा स्वत:च्या हातात घेणार, अक्षरा देईल का सासूला धोबीपछाड?

तसेच नीता यांच्या दुसऱ्या हातावर मोठा मुलगा आकाश त्याची पत्नी श्लोका, मुलगी ईशा व तिचे पती आनंद, मुलं कृष्णा व वेदा यांचे नाव लिहिले आहे. नीता यांच्या व्हिडिओला चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे. नीता यांच्या हातावर असलेली मेहंदी वीणा नागदाने काढली आहे. ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध मेहंदी आर्टिस्ट आहे.    

Tags: anant ambaniMehndinita ambaniradhika ambani
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Colors Marathi serial Rama Raghav will go off air actress Aishwarya Shetye shared post know more

कलर्स मराठीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?, अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चा, म्हणाली, “शेवटचे काही दिवस...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.