बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कलर्स मराठीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?, अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चा, म्हणाली, “शेवटचे काही दिवस…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 13, 2024 | 5:32 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Colors Marathi serial Rama Raghav will go off air actress Aishwarya Shetye shared post know more

कलर्स मराठीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?, अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चा, म्हणाली, “शेवटचे काही दिवस...”

कलर्स मराठी वाहिनीवर गेल्या काही महिन्यांपासून अनेक मालिका व नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘इंद्रायणी’, ‘सुख कळले’, ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ अशा नवीन मालिका व नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आले असून याद्वारे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. आता नव्या मालिका सुरु झाल्यामुळे जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.  स्पृहा जोशीची ‘सुख कळले’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून या नवीन मालिकेमुळे ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. अशातच या वाहिनीवरील आता आणखी एक मालिकाही प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटलं जात आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘रमा राघव’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे असं म्हटलं जात आहे. ‘रमा राघव’ या मालिकेतील रमा म्हणजेच मुख्य अभिनेत्री ऐश्वर्या शेट्ये ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर कामानिमित्तची काही माहितीदेखील ती शेअर करत असते. अशातच तिने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे तिने या मालिकेच्या निरोपाबद्दल सांगितले आहे.

आणखी वाचा – Video : अनंत अंबानीने रामदेव बाबांनाही नाचवलं, भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात का?

ऐश्वर्याने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्याबरोबर राघव म्हणजेच तिचा सहकलाकार, अभिनेता निखिल दामलेदेखील आहे. हा खास व्हिडीओ शेअर करत तिने “शेवटचे काही दिवस” असं म्हटलं आहे. वाहिनी किंवा मालिकेच्या निर्मात्यांकडून याबद्दल अद्याप अधिकृत कोणती घोषणा करण्यात आली नसली तरी अभिनेत्रीच्या या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे मालिका संपणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

आणखी वाचा – भुवनेश्वरीची नवीन खेळी, फॅक्टरीचा कारभार अधिपतीकडून पुन्हा स्वत:च्या हातात घेणार, अक्षरा देईल का सासूला धोबीपछाड?

दरम्यान लवकरच कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस हा सर्वांचा आवडता शोदेखील येणार आहे. येत्या २८ जुलै रोजी ग्रँड प्रीमियर होणार असून त्यानंतर रोज हा शो रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. यंदाच्या पर्वाचे होस्टिंग रितेश देशमुख करणार असल्यामुळे अनेक जण त्यांच्या होस्टिंगसाठीचीही वाट पाहत आहेत.   

Tags: Aishwarya Shetyemarathi entertainment newsrama raghav
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
Next Post
Adarsh Shinde sang the popular Vitthal song of his grandfather Pralhad Shinde video viral

Video : विठ्ठल मंदिरात दर्शन, महाआरतीचा मान अन्...; आजोबांच्या आठवणीत आदर्श शिंदेने गायलं त्यांचंच लोकप्रिय गाणं, गायकावर कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.