सध्या सर्वत्र अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. येत्या १२ जुलै रोजी दोघांचाही शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. दोघांची लग्नाची तारीख समोर येण्याआधी फेब्रुवारी महिन्यात गुजरात येथील जामनगरमध्ये शाही प्री-वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्याची चर्चा जगभर झाली. त्यानंतर पुन्हा एकदा जून महिन्यात त्यांचा दुसऱ्यांदा प्री-वेडिंग सोहळा पार पडला. हा सोहळा आलिशान क्रुजवर आयोजित करण्यात आला होता. इटली ते रोमदरम्यान पार पडलेल्या सोहळ्याची चर्चा जगभर झालेली दिसून आली. आता त्यांच्या लग्नाच्या आधीच्या सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. (Justin Bieber return to america)
नुकताच अनंत व राधिकाचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी बॉलीवूडमधील कलाकार मंडळींनी उपस्थिती दर्शवली. या संगीत सोहळ्यासाठी हॉलीवूड पॉपस्टार जस्टीन बिबरनेही हजेरी लावली होती. जस्टीनचा स्पेशल परफॉर्मन्स आयोजित करण्यात आला होता. त्याने ५ जुलै रोजी त्याने आपला परफॉर्मन्स दिला. त्याच्या धमकेदार परफॉर्मन्सने सगळ्यांनाच नाचायला भाग पाडले. या सोहळ्यामध्ये परफॉर्मन्स करण्यासाठी जस्टीनने सुमारे १० मिलियन डॉलर्स चार्जेस घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.
परफॉर्मन्स झाल्यानंतर जस्टीन पुन्हा अमेरिकेला जाण्यासाठी रवाना झाला. ६ जुलै रोजी त्याला पुन्हा एकदा एअरपोर्टवर स्पॉट केले गेले. मात्र सगळ्यांना रिहानाची आठवण आली. फेब्रुवारीमध्ये रिहानानेही अंबानी कुटुंबाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. जामनगरमध्ये तिचा वावर हा खूपच छान होता. रिहाना परफॉर्मन्सनंतर पुन्हा मायदेशी रवाना होताना तेथे उपस्थित असणाऱ्या फोटोग्राफर्सबरोबर तिने फोटो काढले होते. तसेच तिथे सिक्युरिटीसाठी असणाऱ्या महिला कॉन्स्टेबलबरोबरही फोटो काढला होता. यामुळे रिहानाचे खूप कौतुकदेखील केले गेले होते.
मात्र जस्टीन जेव्हा अमेरिकेला परतत होता तेव्हा फोटोग्राफर्स व उपस्थितांनी त्याच्याबरोबर एक काढण्याची मागणी केली. मात्र कोणाचंही न ऐकता तो पुढे निघून गेला. त्याच्या या कृतीमुळे चाहते प्रचंड नाराज झाले आणि त्याची तुलना रिहानाबरोबर केली. दरम्यान आता सोहळ्यासाठी रॅपर ड्रेक व गायक एडेल व लाना डेलदेखील भारतात हजेरी लावतील मात्र याची पुष्टी अद्याप करण्यात आली नाही.