शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

महागडी घरं, प्रायव्हेट जेट आणि…; अनंत अंबानी व राधिका मर्चंटला लग्नात मिळाल्या ‘या’ महागड्या भेटवस्तू, किंमत ऐकून व्हाल थक्क

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 21, 2024 | 6:30 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Anant Ambani Radhika Merchant gifts

महागडी घरं, प्रायव्हेट जेट आणि…; अनंत अंबानी व राधिका मर्चंटला लग्नात मिळाल्या 'या' महागड्या भेटवस्तू, किंमत ऐकून व्हाल थक्क

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचे लग्न लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांपासून ते मुख्य समारंभापर्यंत एक भव्यदिव्य सोहळा होता. हा सोहळा अगदी थाटामाटात संपन्नही झाला. अंबानी कुटुंबाने जगभरातील मर्यादित पाहुण्यांना आमंत्रित केले. अभिनेते, अभिनेत्री, व्यावसायिक व्यक्ती आणि अगदी पंतप्रधानांसह जगभरातून सुमारे १४ हजार पाहुण्यांना या विलक्षण उत्सवासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या आदरणीय पाहुण्यांनी अनंत व राधिकासाठी आशीर्वादस्वरुपी खास भेटवस्तूही दिल्या. या प्रख्यात पाहुण्यांनी अनंत व राधिकाला त्यांच्या या खास दिवशी नेमक्या काय भेटवस्तू दिल्या याबाबत जाणून घेऊया. (Anant Ambani Radhika Merchant gifts)

अनंत अंबानीचे आई-वडील नीता व मुकेश अंबानी यांनी नवविवाहित जोडप्याला पाम जुमेराह येथे ३००० चौरस फुटांचे घर भेट म्हणून दिले आहे. ज्याचे मूल्य रु. ६४० कोटी इतके असल्याचं समोर आलं आहे. त्यात १० बेडरुम व एक खासगी बीच आहे. याशिवाय त्यांनी अनंतला ५.४२ कोटी रुपयांची बेंटले कॉन्टिनेंटल जीटीसी स्पीड कार आणि राधिकाला १३० कोटी रुपये किमतीचे दागिनेही भेट दिले.

आणखी वाचा – अनंत अंबानी व तैमूरच्या नॅनीचा पगार आहे तरी किती?, कॉर्पोरेट कंपनीच्या कर्मचाऱ्यालाही मागे टाकेल, ऐकून व्हाल थक्क

अनंत व राधिकाच्या लग्नाला बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. ‘बॉलीवूडलाइफ’च्या रिपोर्टनुसार, कतरिना कैफ व विकी कौशल यांनी अनंत-राधिकाला त्यांच्या लग्नात १९ लाख रुपयांची सोन्याची चैन भेट दिली. तर अक्षय कुमारने ६० लाख रुपये किमतीचा सोन्याचा पेन दिला. शाहरुख खानने फ्रान्समध्ये ४० कोटी रुपये किमतीचे आलिशान अपार्टमेंट गिफ्ट केले आहे. तर बच्चन कुटुंबाने ३० कोटी रुपयांचे नेकपीस दिले आहे. तसेच सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीने २५ लाख रुपये किमतीची हाताने बनवलेली शाल त्यांना भेट दिली. आलिया भट्ट व रणबीर कपूरने या जोडप्याला ९ कोटी रुपयांची मर्सिडीज कार दिली. तर रणवीर सिंग व दीपिका पदुकोण यांनी २० कोटी रुपयांची कस्टमाइज्ड रोल्स रॉयस कार भेट दिल्याचे बोलले जात आहे. सलमान खानने अनंतला १५ कोटी रुपयांची स्पोर्ट्स बाईक भेट दिली.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीला लेन्स लावणं पडलं महागात, डोळ्यांची अशी झाली अवस्था, म्हणाली, “मला दिसायचं बंद झालं आणि…”

इतकंच नव्हे तर परदेशी पाहुणे ॲमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांनी या जोडप्याला ११.५० कोटी रु. किमतीची बुगाटी भेट दिली. तर अमेरिकन अभिनेता जॉन सीनाने त्यांना ३ कोटी रुपयांची लॅम्बोर्गिनी कार भेट भेट म्हणून दिली आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी त्यांना ३०० कोटी रुपयांचे खासगी जेट पाठवले आहे. तर बिल गेट्स यांनी ९ कोटी रुपयांची हिऱ्याची अंगठी आणि १८० कोटी रुपयांचे आलिशान यॉच भेट दिले आहे. याशिवाय सुंदर पिचाई यांनी त्यांना १०० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर भेट दिले. तर इवांका ट्रम्प यांनी नवविवाहित जोडप्याला अमेरिकेत ८० कोटी रुपयांचे आलिशान घर दिले आहे.

Tags: Anant Ambani Radhika Merchant giftsAnant Ambani-Radhika MerchantAnant Ambani-Radhika Merchant Weddingentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
22 july 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

मेहनत केल्यास यश हमखास, आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच लाभदायक आहे, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.