बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding : बॉलिवूडला कामाला लावलं, अंबानींच्या सुनेसाठी जान्हवी कपूर आरतीचं ताट घेऊन उभी, नेटकरी म्हणाले, “यांना जागा दाखवली…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 4, 2024 | 11:09 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Anant Ambani and Radhika Merchant Pre Wedding Celebration Updates in Marathi

बॉलिवूडला कामाला लावलं, अंबानींच्या सुनेसाठी जान्हवी कपूर आरतीचं ताट घेऊन उभी, नेटकरी म्हणाले, “यांना जागा दाखवली...”

Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding in Jamnagar : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा म्हणजे अनंत अंबानी व राधिक मर्चट यांचा लग्नाआधीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. 1 ते 3 मार्च दरम्यान झालेल्या कार्यक्रमामध्ये जगातील सर्व दिग्गजांनी हजेरी लावली होती. फेसबुकचे मार्क झुकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स तसेच अदाणी समूहाचे गौतम अदाणी यांनी उपस्थिती दर्शवली. पण यामध्ये सर्वाधिक लक्ष वेधले ते बॉलिवूड सेलिब्रिटींनी. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येक कलाकाराने कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात भाग घेतला. सेलिब्रिटींच्या येण्यापासून ते जामनगर येथून मुंबईसाठी रवना होईपर्यंत सर्वांचीच चर्चा रंगली.   

अनंत व राधिका लग्नाआधीच्या सोहळ्याची देशभरात चर्चा झाली. हॉलिवूड पॉपस्टार रिहानाचा ‘झिंगाट’वरील डान्स, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचा ‘बोले चुडीया’वरील परफॉर्मन्स तसेच आई-बाबा होणाऱ्या दीपिका पदुकोण व रणवीरचा जबरदस्त डान्स या सर्वांनीच कार्यक्रम उत्साहात पार पडला. पण आता अभिनेत्री जान्हवी कपूर एका व्हिडीओमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

आणखी वाचा – Indian Idol 14 Winner : कानपूरच्या वैभव गुप्ताने पटकावलं ‘इंडियन आयडल १४’चे विजेतेपद, आकर्षक ट्रॉफीसह मिळाले तब्बल इतके रुपये, अलिशान कार अन्…

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अनंत व राधिकाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमामध्ये शेवटच्या दिवशी अनंत व राधिका हे एकमेकांसमोर येणार होते. अनंत मंचावर उभा होता तर राधिका नवरीच्या वेशात अनंतकडे नाचत-गात येत होती. त्यावेळी बाजूला उभ्या असलेल्या उपस्थितांमध्ये जान्हवी हातात आरतीचे ताट घेऊन उभी होती. यावेळी जान्हवीने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. जान्हवीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरवात केली.

आणखी वाचा – ‘अच्छा तो हम चलते है’, धर्मेंद्र यांच्या ‘त्या’ पोस्टने वेधले लक्ष, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

या व्हायरल व्हिडीओवर एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “जान्हवीला हातात ताट देऊन उभे करून अंबानींनी तिला तिची जागा दाखवली”, दूसरा नेटकरी लिहितो की, “सर्व सेलिब्रिटींना कामाला लावलं”, त्यानंतर अजून एकाने लिहिले की, “जान्हवीला फुलं टाकण्यासाठी ठेवलं आहे का?”, असे म्हणत सर्व नेटकऱ्यांनी जान्हवीला ट्रोल केले आहे. या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशीचा जान्हवीने रिहानाबरोबर ‘झिंगाट’वर डान्स करत असलेला व्हिडीओही इन्स्टाग्राम आकाऊंटवरुन शेअर केला होता. यावरही नेटकऱ्यांनी अनेक संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या.

Tags: Anant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding bashAnant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding JamnagarAnant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding Marathi NewsRihannaRihanna in Anant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Next Post
Kareena kapoor son Jeh made a funny face while they left Jamnagar video viral on social media

Video : करीना कपूरचा लेक भलताच खट्याळ, जीभ काढून कॅमेऱ्यामॅनलाच चिडवून दाखवलं, आई हात धरुन खेचू लागली अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.